शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

प्रदक्षिणेला एकटे गेल्याने लक्ष्मीदेवीला राग अनावर; लक्ष्मीनारायण यांच्यात फुलांची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 5:11 PM

ब्रम्होत्सवाचा सोहळा आज (दि. ६) पुण्यातील कापडगंज येथील लक्ष्मी-नारायण मंदिरात उत्साहात पार पडला. गेल्या ९० वर्षांपासून ही परंपरा या मंदिरामध्ये सुरू आहे.

ठळक मुद्देगेल्या ९० वर्षांपासून या मंदिरामध्ये सुरू आहे परंपरात्याबाबत सांगितली जाते लक्ष्मी-नारायण यांच्या प्रेमाची अख्यायिका

श्रीकिशन काळे पुणे : भगवान नारायण लक्ष्मीला सोडून सकाळी एकटेच प्रदक्षिणेसाठी गेले. त्यामुळे चिडलेल्या लक्ष्मीदेवीचा राग अनावर झाला आणि त्या रागाचा सामना भगवान नारायण यांना करावा लागला. लक्ष्मीदेवीने त्यांना घरातच घेत नाही. सात वेळा दरवाजा बंद करते. परंतु, भगवान नारायण शेवटी लक्ष्मीदेवींना प्रसन्न करतात आणि मग ब्रम्होत्सव साजरा केला जातो. हा ब्रम्होत्सवाचा सोहळा आज (दि. ६) पुण्यातील कापडगंज येथील लक्ष्मी-नारायण मंदिरात उत्साहात पार पडला. गेल्या ९० वर्षांपासून ही परंपरा या मंदिरामध्ये सुरू आहे. मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त हा सोहळा साजरा केला जातो. त्याबाबत लक्ष्मी-नारायण यांच्या प्रेमाची अख्यायिकाही सांगितली जाते. याबाबत सत्येंद्र राठी म्हणाले,‘‘गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. लक्ष्मी-नारायण दोघे दररोज सकाळी प्रदक्षिणेसाठी निघत असतात. परंतु, एके दिवशी भगवान नारायण एकटेच प्रदक्षिणेला जातात. त्यामुळे लक्ष्मीदेवी खूप चिडतात. त्यामुळे भगवान नारायण घरी परत आल्यानंतर त्यांना त्या घरातच घेत नाहीत. भगवान त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक वेळी वेगळी वेषभूषा करतात. सात वेळा ते दरवाजासमोर जातात. परंतु, सातही वेळा लक्ष्मीदेवी दरवाजा बंद करतात. त्यानंतर दोघांमध्ये फुले फेकून मारण्याची लढाई होते. शेवटी भगवान नारायण हे लक्ष्मीदेवींना प्रसन्न करतात आणि घरामध्ये घेतात. हा सोहळा या मंदिरात साजरा केला जातो. आज सकाळी हा पालखी सोहळा झाला. उद्या सकाळी लक्ष्मी-नारायण दोघे सोबत प्रदक्षिणेला निघातात, तेव्हा मोठी शोभायात्रा काढली जाते.’’  

टॅग्स :Puneपुणे