शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
3
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
4
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
5
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
6
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
7
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
8
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
9
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
10
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
11
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
12
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
13
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
14
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
15
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
16
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
17
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
18
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
19
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
20
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल

"सुनांचा छळ करणाऱ्या कुटुंबीयांवर बहिष्कार..”, मराठा समाजाचा ऐतिहासिक निर्णय

By किरण शिंदे | Updated: May 26, 2025 22:05 IST

वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची बैठक, अनिष्ट प्रथांविरोधात समिती स्थापन

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे समाजमन हादरून गेले असून, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मराठा समाजाच्या वतीने एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत लग्नकार्यांमध्ये चालू असलेल्या अनिष्ट चालीरीतींना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने ठोस निर्णय घेण्यात आले.

समाजातील प्रतिष्ठित मंडळींची समिती स्थापन

पुणे शहर आणि जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रतिष्ठित मंडळींनी एकत्र येत एक बैठक घेतली. आणि या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे श्रीकांत शिरोळे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, वैष्णवीसारख्या मुलींना भोगावा लागणारा छळ थांबवण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित लोकांची एक विशेष समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती लग्नांमधील अनावश्यक खर्च, हुंडा प्रथा आणि मुलींवरील छळ थांबवण्यासाठी मार्गदर्शन करेल आणि उपाययोजना राबवेल.

स्वतःपासून बदलाला सुरुवात

अरविंद शिंदे यांनी बोलताना सांगितले की, आज झालेल्या या बैठकीनंतर अनेकांनी स्वतःच्या घरापासूनच या बदलाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. साधेपणाने लग्न करणे, फाजील खर्च टाळणे आणि अशा प्रकारच्या हुंड्याच्या मागण्या न करणे हे ठरवण्यात आले आहे. तसेच, ज्या कुटुंबांमध्ये मुलींचा छळ होईल, त्यांच्याशी 'रोटी-बेटी'चा व्यवहार बंद करण्याचा ठराव देखील यावेळी झाला.

नवीन सामाजिक नियमांची अंमलबजावणी

लग्न सोहळे साधेपणाने करणे

मोठ्या मंडळींच्या लग्नाचे अंधानुकरण टाळणे

वेळेत लग्न करणे

मुलगी छळली गेल्यास संबंधित कुटुंबावर सामाजिक बहिष्कार

गाडी, सोनं, अंगठी यांसारख्या देणग्यांचा सार्वजनिक निषेध

अशा मागण्या करणाऱ्याना थेट जाऊन समज देण्याचा निर्धार

प्रवृत्तींवर बहिष्काराचा इशारा

चेतन तुपे यांनी सांगितले की, वैष्णवीप्रमाणे जर कोणत्याही मुलीवर हुंड्यासाठी छळ झाला तर त्या प्रवृत्तीवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल. समाजात स्पष्ट संदेश जाईल की अशा प्रकारचे वर्तन सहन केले जाणार नाही.

ही बैठक म्हणजे मराठा समाजात सामाजिक शुद्धीकरणाची सुरूवात मानली जात आहे. विवाहसंस्थेतील अनिष्ट प्रथांना छेद देत समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी समाजातील प्रत्येक कुटुंबाने जबाबदारीने पाऊल उचलणे अपेक्षित आहे."

टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPuneपुणे