शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

रस्ता नसल्याने डिस्चार्ज मिळालेल्या आईसाठी डोली करून मुलगा ३० किलोमीटर अंतर चालला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 3:12 PM

दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यावर रस्ता नसल्याने आईला डोली करून नेण्याची वेळ...

राजेंद्र रणखांबे -

मार्गासनी : पुणे जिल्ह्यात अद्यापही काही गावे अशी आहे की, त्याठिकाणी रस्ते, वीज, पाणी या जीवनावश्यक सुविधा पोहचलेल्या नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना आरोग्य सेवांसाठी जीवतोड संघर्ष करावा लागतो आहे. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. आईला आपल्या गावी घरी नेण्यासाठी मुलाने आणि एका नातेवाईकाने डोंगर कड्या कपारीतुन ३० किलोमीटरचे खडतर अंतर पार करत डोलीवरून घोल या गावात पोहचवले. अतिशय खडतर प्रवास लीलयापार केल्यामुळे गावात आल्यानंतर परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील चांदर हे गाव दऱ्या खोऱ्यांच्या मध्यभागी व दोन्ही डोंगरांच्या मध्यभागी वसलेले आहे. स्वातंत्र्यानंतर अद्यापही या गावात कोणताही रस्ता झालेला नाही. त्यामुळे गावात दळणवळणाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही.गावातून एसटीसाठी जायचे झाल्यास डोंगर चढुन तीन तासांच्या प्रवासानंतर एसटीच्या थांब्यावर पोहचता येते. गावातील बारकाबाई लक्ष्मण सांगळे (वय ६०) ह्या आजारी पडल्या. पुणे शहराकडे येण्यासाठी तीन तास चालणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचा मुलगा बाळासाहेब लक्ष्मण सांगळे व दीर मारुती सांगळे यांनी तिला महाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर आजीला घरी सोडले. त्यावेळी मुलगा व दीर यांनी रायगड किल्ल्याच्या डोंगर रांगामधुन तिला उन्हा-तान्हात पायपीट करत कधी थांबत तर कधी थोडीसी विश्रांती घेत डोलीमधुन आपल्या मूळ गावी चांदर येथे आणले.

सह्याद्रीच्या डोंगर रांगा या परिसरात असुन किल्ले रायगड,किल्ले लिंगाणा असे अवघड गड देखील याच भागात आहेत.उंच उंच भिंतीसारखे याठिकाणी मोठ मोठे कडे आहेत.केवळ वाऱ्याची झुळुकच या कडी कपारीतुन जाऊ शकते. प्राणी व मानव या अवघड वाटेतुन जाऊ शकत नाही.जाताना वाटेत खुप मोठे जंगल येते. या जंगलात रानटी जनावर देखील आहेत.बिबट्याचे,दर्शन या परिसरात ग्रामस्थांना नेहमीच घडत असते. तरीदेखील आजीच्या इच्छेसाठी मुलाने व दिराने या अवघड वाटेतुन तब्बल तीस किलोमीटर प्रवास करत डोलीमधुन आजीला गावी सुखरुप आणले. आधुनिक युगात मुले आईवडिलांना अनाथ आश्रमात पाठवतात.पण याच युगात अजुनदेखील श्रावणबाळ जिवंत आहे. जे आईने व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रचंड खडतर प्रवास करतात.

आजीला आपल्या गावी घरी नेण्यासाठी आजीच्या मुलाचा व दिरांचा डोंगर कड्या कपारीतुन जीवघेणा प्रवास करीत घोल या गावात पोहचवले. अतिशय खडतर प्रवास या दोघांनी यशस्वीरित्या पार केला. गावात आल्यानंतर ग्रामस्थांनी मुलाचे व दिराचे कौतुक केले.

माझ्या आईची एकच इच्छा होती की, मला माझ्या गावात मरण आले पाहिजे.त्यासाठी तिला महाड येथुन डोंगर दऱ्यांमधून डोलीकरून मूळ गावी चांदर येथे आणले.- बाळासाहेब सांगळे, मुलगा. .... गावामध्ये दळणवळणाचे कोणतेही साधन नाही तसेच आरोग्यसेवेसाठी पुण्यापेक्षा महाडला जाण्यास आम्हाला सोयीस्कर आहे. डोंगर दऱ्यातील पायवाटेने महाडला जाता येते.बारकाबाईला दवाखान्यातुन सोडल्यानंतर तिच्या इच्छेप्रमाणे गावात आणले.- मारुती सांगळे, दीर     

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरhighwayमहामार्गState Governmentराज्य सरकारAjit Pawarअजित पवार