शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

१० लाखांच्या खंडणीसाठी दोन वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा मुख्य सुत्रधार जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 08:53 IST

वडाची वाडी येथील बंगल्याच्या आवारात दोन वर्षाच्या मुलगा खेळत असताना अपहरण करुन १० लाखांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांच्या मुख्य सुत्रधाराला जेरबंद करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देवडाची वाडी येथील बंगल्याच्या आवारात दोन वर्षाच्या मुलगा खेळत असताना अपहरण करुन १० लाखांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांच्या मुख्य सुत्रधाराला जेरबंद करण्यात पुणे पोलिसांना यश आले.अपहरणाचा हा प्रकार २३ मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला होता. मुलाची यशस्वीपणे सुटका केल्यानंतर गेले चार दिवस गुन्हे शाखेची टीम या अपहरणकर्त्यांचा शोध घेत होती.

पुणे - वडाची वाडी येथील बंगल्याच्या आवारात दोन वर्षाच्या मुलगा खेळत असताना अपहरण करुन १० लाखांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांच्या मुख्य सुत्रधाराला जेरबंद करण्यात पुणेपोलिसांना यश आले आहे.

अपहरणाचा हा प्रकार २३ मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला होता. त्यानंतर पुढील ११ तासात पोलिसांनी पुष्कराज सोमनाथ धनवडे या दोन वर्षाच्या मुलाची सुटका केली होती. मात्र, यावेळी अपहरण करणारे पळून गेले होते. मुलाची यशस्वीपणे सुटका केल्यानंतर गेले चार दिवस गुन्हे शाखेची टीम या अपहरणकर्त्यांचा शोध घेत होती. गुरुवारी सकाळी तो मांजरी येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे छापा घालून त्याला ताब्यात घेतले आहे. 

सध्या पोलीस त्याच्याकडे चौकशी करीत असून तो आपली वेगवेगळी नावे सांगत आहे. त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. सोमनाथ धनवडे हे व्यावसायिक असून त्यांचा वडाची वाडी येथे बंगला आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता पुष्कराज हा बंगल्याच्या आवारात खेळत होता. तेव्हा त्याचे अपहरण करण्यात आले.  त्यानंतर काही वेळाने सोमनाथ धनवडे यांना फोन करुन अपहरणकर्त्यांनी मुलाला सोडायचे असेल तर १० लाख रुपयांची खंडणी मागितली. धनवडे यांनी ही माहिती तातडीने पोलिसांना दिली. २ वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी अपहरण झाल्याचे समजताच  कोंढवा पोलीस आणि गुन्हे शाखेची विविध पथके कामाला लागली. एक टीम नाशिकच्या दिशेने रवाना झाली. तांत्रिक विश्लेषणातून अपहरणकर्ते हे उंड्री परिसरात असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी, कर्मचारी असा ७० ते ८० जणांचा फौजफाटा रात्री उंड्रीमध्ये दाखल झाला. त्यांनी या परिसरातील एक एक जागा पिंजून काढण्यास सुरुवात केली. 

पोलिसांच्या मदतीला काही ग्रामस्थही होते. हंडेवाडी परिसरात एका बाजूला पहाटेच्या सुमारास ग्रामस्थांना मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. त्याबरोबर पोलिसांनी त्या भागात शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा एका बाजूला गोडावून आढळून आली. त्या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न करीत असताना ग्रामस्थांना एक जण मुलाला घेऊन पळून जात असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याने घाबरुन शेतात मुलाला सोडून तो पळून गेला. 

पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन रविवारी सकाळी त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रभर अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन पुष्कराजची सुटका करण्यात यश मिळविले.

टॅग्स :PuneपुणेArrestअटकPoliceपोलिस