शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

नीचांकी भावाने चाकण बाजारात कांदा मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 2:39 AM

भावात मोठी घसरण, सरासरी भाव ३ ते ७ रुपये किलो, चिंगळी कांदा एक रुपया किलो

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये जुना व नवीन अशा दोन्ही कांद्यांची आवक झाल्याने आवकेत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर गडगडले आहेत. घाऊक बाजारात कांद्याला सरासरी ३ रुपयांपासून ७ रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.मागील वर्षी याच हंगामात जुन्या साठविलेल्या कांद्याला ३५ रुपये प्रतिकिलोस भाव होता, त्यामुळे याही वर्षी भाव वाढेल, या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठविला होता, पण भाव गडगडल्याने शेतकºयांची निराशा झाली असून, उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले असून कांदाउत्पादनासाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. यामुळे शेतकºयांवर कांदे फुकट वाटण्याची वेळ आली आहे. चाकण बाजारात काल प्रतिक्विंटल ३०० ते ७०० रुपये भाव मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहे; मात्र बाजार समिती कांद्याला कमीत कमी ३०० व जास्तीत जास्त १००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे सांगत आहे.वखारीतील कांदा सडतोयअनेक शेतकºयांनी मागील वर्षी साठविलेला जुना कांदा चांगल्या हवामानामुळे टिकून राहिला असला, तरी आता तो सडण्याच्या मार्गावर आहे. मागील वर्षी या हंगामात चांगला भाव मिळाल्याने शेतकºयांमध्ये समाधान होते; परंतु बाजारात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जुन्या कांद्यावरील आवरण काळे पडू लागल्याने प्रतवारी करताना निम्म्याहून अधिक कांदे फेकून द्यावे लागत आहेत. जुन्या कांद्याला अतिशय कमी म्हणजे, अगदी १ रुपयापासून सहा रुपयांपर्यंत तर, नवीन कांद्याला ४ ते ७ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.हमीभाव देण्याची मागणीकांदा उत्पादन करताना मशागत, लागवड, खुरपणी, पाणी, खते, औषधे, फवारणी, काढणी, मजुरी, पॅकिंग, वाहतूक, वीजबिल असा एकरी ३५ ते ४५ हजार रुपये खर्च येतो व आजच्या बाजारभावानुसार कांद्याचे १५ ते २० हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे शेतकºयाला एकरी २० ते २५ हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकºयाला खासगी सावकार, सोसायट्या, बँकांकडून घेतलेले कर्ज परतफेड करता येत नाही. त्यामुळे सरकारने शेतकºयांना कृषी वीजबिले माफ करून शेतीसाठी मोफत वीज द्यावी, व शेतमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.शेतकºयांकडे असणारा कांद्याचा जुना साठा व नवीन काढलेला कांदा एकाचवेळी बाजारात आल्याने आवक वाढली. त्याचा भावावर परिणाम झाला आहे. साठवलेला जुना कांदा संपला की कांद्याला चांगला भाव मिळू शकतो.- चंद्रकांत इंगवले, सभापती खेड बाजार समितीपाकिस्तान व अफगाणिस्तान मधून मोठ्या प्रमाणावर कांदा कर्नाटकमध्ये आयात झाला असून, कांद्याचा मोठा साठा झाला आहे. त्यातच कांद्याची निर्यात बंद असल्याने भाव गडगडले आहेत. शेतकºयांच्या हितासाठी कांदा निर्यात सुरू करावी.- तुकाराम बोत्रे, शेतकरी, खालुंब्रेनव्याने बाजारात येणारा पंचगंगा कांदा टिकत नसल्याने त्याची बाजारात आवक वाढली आहे. तुलनेने मागणी कमी व बाजारात कांद्याचा पुरवठा जास्त झाल्याने त्याचा बाजारभावावर परिणाम झाला आहे.- माणिक गोरे ( कांदा व्यापारी, आडतदार, चाकण मार्केट यार्ड )

टॅग्स :onionकांदाChakanचाकणFarmerशेतकरी