खूनप्रकरणी दोघांना अटक

By Admin | Updated: October 14, 2016 04:47 IST2016-10-14T04:47:25+5:302016-10-14T04:47:25+5:30

किरकोळ कारणावरून तरुणाच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोघांना अटक केली.

Both of them were arrested in the murder case | खूनप्रकरणी दोघांना अटक

खूनप्रकरणी दोघांना अटक

पुणे : किरकोळ कारणावरून तरुणाच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोघांना अटक केली.
रवी देविदास कांबळे (वय २०, रा. हिंगणे) आणि विजय गणेश देवलेकर (वय १९, रा. हिंगणे) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी आणखी दोघांचा शोध सुरू आहे. ही घटना १२ आॅक्टोबर रोजी पहाटे ही घडली असून, त्यात संदीप लक्ष्मण निंगुळे (वय १९, रा. आनंदनगर) याचा खून झाला होता़ याप्रकरणी त्यांचा भाऊ संजय निंगुळे (वय २१) यांनी फिर्याद दिली आहे.
दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या साथीदारांना अटक करायची आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केली. न्यायालयाने त्यांना १६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Both of them were arrested in the murder case