तालुकाप्रमुखावरील हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक
By Admin | Updated: August 20, 2015 00:45 IST2015-08-20T00:45:48+5:302015-08-20T00:45:48+5:30
पुरंदर तालुका शिवसेना तालुकाप्रमुख आणि पंचायत समितीचे सदस्य दिलीप सोपानराव यादव यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी त्यांच्याच दोन पुतण्यांना अटक करण्यात आली.

तालुकाप्रमुखावरील हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक
सासवड (जि. पुणे) : पुरंदर तालुका शिवसेना तालुकाप्रमुख आणि पंचायत समितीचे सदस्य दिलीप सोपानराव यादव यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी त्यांच्याच दोन पुतण्यांना अटक करण्यात आली.
दिलीप यादव (५५) हे १० आॅगस्ट रोजी दुपारी १२.३०च्या सुमारास श्रीनाथ पतसंस्थेमध्ये कामकाज करीत असताना सागर (३०) आणि प्रसाद बाळासाहेब यादव (२७) हे दोघे भाऊ तेथे आले आणि दिलीप यादव यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. सागर याने शर्टच्या आत लपविलेला कोयता काढला आणि काही कळायच्या आत दिलीप यांच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून वार हाताने अडविल्याने हाताला जखम झाली. त्यानंतर दोघेही पळून गेले. बुधवारी रात्री या दोघांविरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी या दोघांना लगेच ताब्यात घेतले. त्यांना २१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.