शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही शिवसेनांना लढावी लागणार अस्तित्वाची लढाई;जागांसाठी होणार झगडा

By राजू इनामदार | Updated: June 14, 2025 10:52 IST

स्वतंत्र लढायचे ठरले तर दोन्ही शिवसेनांमध्ये त्यासाठीच्या बळाचा अभाव दिसतो आहे.

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेनांना अस्तित्वाची लढाई लढावी लागण्याची चिन्हे आहेत. महायुतीतील एकनाथ शिंदे सेना व महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जागा मिळवण्यापासून झगडा करावा लागण्याची शक्यता आहे. स्वतंत्र लढायचे ठरले तर दोन्ही शिवसेनांमध्ये त्यासाठीच्या बळाचा अभाव दिसतो आहे.

एकत्रित शिवसेनेचे विसर्जित महापालिकेत १० नगरसेवक होते. त्यातील एक जण आता शिंदेसेनेत आहेत, ५ जणांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राहिलेल्या ४ जणांमध्येही चलबिचल सुरू असल्याची चर्चा आहे. अशा वेळी संघटनेमध्येही बरीच गडबड आहे. दोन शहरप्रमुख असतानाही महापालिकेसाठी म्हणून मनसेतून व्हाया वंचित आघाडीमार्फत आलेले पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच राहिलेले वसंत मोरे यांना महापालिका निवडणूक प्रमुख केले आहे. ‘आव्वाज कोणाचा’ अशी घोषणा असलेल्या शिवसेनेचे शहरात फारसे राजकीय वजन राहिलेले नाही. फुटीनंतर शक्ती क्षीण झाली आहे. १० पैकी ६ जणांनी पक्ष सोडला. मात्र, नेतृत्वाने त्याची म्हणावी, अशी दखलही घेतलेली नाही.

फुटून बाजूला झालेल्या व आपलीच शिवसेना खरी असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही शहरात पाय रोवणे अद्याप शक्य झालेले नाही. फुटीनंतर फक्त एका माजी नगरसेवकाने प्रवेश केला. त्यांना शहराध्यक्ष केले गेले. ते आहेत उपनगरातील, त्यांना त्यांच्याही निवडणुकीची काळजी. संपर्क प्रमुख असलेले अजय भोसले यांनाही शहरात नव्याने संघटन करता आलेले नाही. काँग्रेसचे माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकर यांना पक्षात प्रवेश देत महानगरप्रमुख हे नवे पद देण्यात आले. त्यामुळे अन्य पदाधिकारी जपून पावले टाकताना दिसतात. धंगेकर यांनाही जोरदार सुरूवात करता आलेली नाही, असेच दिसते आहे. अन्य काही पदाधिकारी आहेत; पण त्यांना अजून संपूर्ण शहरात लोकप्रियता नाही.

अशा राजकीय पटावर युती आघाडी अशी निवडणूक झालीच तर महायुतीमध्ये शिंदेसेनेवर व मविआत उद्धव सेनेवर जागा वाटपामध्ये बरीच तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. दोन्ही ठिकाणी त्यांचे मित्रपक्ष त्यांच्यापेक्षा वरचढ आहेत. युतीमध्ये भाजप व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शिंदेसेनेला मोठे होऊ देईल, असे दिसत नाही. मविआत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आधी काँग्रेसवर व नंतर शिवसेनेवर जोर राहील असे दिसते. स्वतंत्रपणे निवडणूक झालीच तर भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी यांची शहरात राजकीय ताकद आहे. मविआत काँग्रेस व उद्धवसेना यांच्यात फार फरक नाही; पण तरीही काँग्रेसचा हात मोठा राहण्याची चिन्हे आहेत. स्वबळावर लढण्याइतके राजकीय बळ दोन्ही शिवसेनांकडे नाही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे