शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जबरी चोरी करणा-या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 16:04 IST

दुचाकीवरुन जाणा-या वृद्धाला मारहाण करुन जबरी चोरी करणा-या दोघांना पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कर्जत व श्रीगोंदा येथून अटक केली. रामू राजू माने (वय २१, रा. कर्जत, जि़ अहमदनगर) आणि सोमनाथ बाळू खेतमाळीस (२६, रा़ श्रीगोंदा, जि़ अहमदनगर) अशी त्यांची नावे आहेत. 

पुणे - दुचाकीवरुन जाणा-या वृद्धाला मारहाण करुन जबरी चोरी करणा-या दोघांना पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कर्जत व श्रीगोंदा येथून अटक केली. रामू राजू माने (वय २१, रा. कर्जत, जि़ अहमदनगर) आणि सोमनाथ बाळू खेतमाळीस (२६, रा़ श्रीगोंदा, जि़ अहमदनगर) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी भिवाजी बाबूराव साकोरे (७२, रा़ कान्हूरमेसाई) यांनी शिरुर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. साकोरे हे २ जूनला दुचाकीवरुन जात असताना आण्णापूर, येवले माथा येथे मागाहून दोघे जण आले. त्यांनी साकोरे यांच्या दुचाकीला लाथ मारुन त्यांना खाली पाडले. त्यांच्या पाठीत दगड मारुन जखमी केले.  त्यांच्या खिशातील १२०० रुपये, बोटामधील अंगठी, मोबाईल जबरदस्तीने काढून घेतली. त्यांना रस्त्याच्या कडेच्या चारीमध्ये ढकलून देऊन त्यांची दुचाकी घेऊन ते पळून गेले होते. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.अनेक दिवस या गुन्ह्याचा तपास न लागल्याने त्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व त्यांच्या सहका-यांकडून केला जात होता. चोरट्यांच्या वर्णनांवरुन ते नगर, श्रीगोंदा भागातील असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यादृष्टीने तपास सुरु केल्यावर साकोरे यांची चोरुन नेलेली गाडी श्रीगोंदा येथे काही जणांनी पाहिल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यावरुन शोध सुरु असताना चोरीला गेलेला मोबाईल चोरट्यांनी सुुरु केला. त्यावरुन पोलिसांना रामू आणि सोमनाथ यांनी केल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी नगर आणि श्रीगोंदा येथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दोघांनीही गुन्हा कबुल केला. आरोपींचे नातेवाईक शिरुर तालुक्यात राहतात. त्यांच्याकडून परत गावी जात असताना त्यांनी वृद्ध साकोरे यांना पाहून लुटण्याचा बेत आखला होता.  त्यांच्याकडून साकोरे यांची दुचाकी, मोबाईल असा ३७ हजार रुपयांचा माल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. अधिक तपासासाठी दोघांना शिरुर पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसPuneपुणे