शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

चाकण येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दोन तरुण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 15:19 IST

चाकण येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी घडली.

ठळक मुद्देअज्ञात वाहनावरील चालक फरार

चाकण : पुणे-नाशिक महामार्गावर चाकण गावच्या परिसरात झगडे वस्तीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला ठोस बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात आज (दि. ७ ) रात्री बारा वाजून ५० मिनिटांनी झाला. या अपघातात अक्षय उर्फ बंटी संजय गारगोटे ( वय २४, रा. वाकी बु, ता.खेड, जि.पुणे ) व अंकुश कन्हैयालाल अगरवाल ( वय २१, रा. नेहरूचौक, राजगुरूनगर, ता.खेड, जि.पुणे ) हे दोन तरुण जागीच ठार झाले. हे दोघेही होंडा लिओ दुचाकी क्रमांक ( एमएच १४ जी व्ही ९६६३ ) वरून चाकणकडून खेड बाजूकडे जात असताना अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून दुचाकीला ठोस देऊन जखमींना जागेवर सोडून खबर न देता पळून गेला. अमोल दामोदर गारगोटे ( वय २६, रा. संतोषनगर, वाकी बुद्रुक, ता.खेड, जि.पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, अज्ञात वाहन चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रदीप पवार पुढील तपास करत आहेत, अशी माहिती अनिल ढेकणे यांनी दिली. 

टॅग्स :ChakanचाकणAccidentअपघातPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलर