पुणे : एकाबरोबर असलेली खुन्नस काढण्यासाठी दुसऱ्यांच्या आलिशान गाड्या जाळणाऱ्या दोघांना सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे़. ही घटना धायरी परिसरातील रायकरनगरमधील उज्वल टेरेसमधील पार्किंगमध्ये २९ मार्च रोजी पहाटे अडीच वाजता घडली होती़.श्रीकांत सतीश थोपटे (वय २५, रा़ प्रयाग रेसिडेन्सी, धायरी) आणि अक्षय विष्णु मोरे (वय २२, रा़ चव्हाणनगर, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. याप्रकरणी हसन शेख (वय ३४, रा़ धायरी) यांनी सिंहगड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. उज्वल टेरेसमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोघे संशयित दिसून येत होते़ ते दुचाकीवरुन आले व त्यांनी हसन शेख व दिनेश भुसनर यांच्या पार्क केलेल्या आलिशान गाड्यांवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्या होत्या़. सीसीटीव्हीमध्ये दिसणारे दोघेही धायरी राहत असून ते रायकर मळा येथील स्मशानभूमीजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़. त्यावरुन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले़. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी मोटारी पेटवून दिल्याची कबुली दिली़. या दोघांची अभिजित ऊर्फ बटऱ्या गाडे याच्याबरोबर वाद होते़. शेख यांच्यावर मे २०१५ मध्ये उंबऱ्या गणपतीजवळ काही जणांनी वार करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता़. त्यातून ते थोडक्यात बचावले होते़. त्यामध्ये अभिजित गाडे हा आरोपी आहे़. शेख यांची मोटार पेटवून दिली तर त्याचा संशय गाडे याच्यावर घेतला जाऊन त्यांच्यात भांडणे व्हावीत, या हेतूने दोघांनी हा प्रकार केला आहे़. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु जगताप,सहायक पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलीस उपनिरीक्षक गिरीष सोनवणे व तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी केली़.़़़़़़़़़
खुन्नस काढण्यासाठी आलिशान गाड्या पेटवून देणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 15:15 IST
घटना धायरी परिसरातील रायकरनगरमधील उज्वल टेरेसमधील पार्किंगमध्ये आलिशान गाड्यांवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्या २९ मार्च रोजी पहाटे अडीच वाजता घडली होती़
खुन्नस काढण्यासाठी आलिशान गाड्या पेटवून देणाऱ्या दोघांना अटक
ठळक मुद्देधायरीतील घटना : परस्पर काटा काढण्याचा प्रयत्न