शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

इच्छा तिथे मार्ग... जन्मत: हात नाही, तरी पायानेच बॉलिंगसह बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 9:04 AM

भोसरीतील आनंद शर्मा गाजवतोय मैदान

अतुल मारवाडीपिंपरी (पुणे) : इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघतोच, असाच संदेश देणारी व्यक्ती आहे भोसरी येथील आनंद शर्मा. जन्मतः दोन्ही हात नसतानाही जिद्दीने त्याने जे काही केलं ते पाहून अनेकजण थक्क होतात.

आनंदला निगडी यमुनानगर येथील अपंग विद्यालयात सर्व कामे पायांनीच करायचे ‘धडे’ मिळाले. त्याने ‘बी.कॉम.’पर्यंत शिक्षण घेतले. नववी-दहावीत असताना मित्र क्रिकेट खेळत असताना तो त्यांचा खेळ पाहायचा. असेच एकदा मित्र त्याला म्हणाले, ‘अरे नुसताच बघतोस काय, खेळायला ये.’ त्यानंतर आनंदही मैदानात उतरला आणि त्याला जगण्यातील खरा ‘आनंद’ गवसला. 

पायाला चप्पल बांधून प्रॅक्टिसआनंदने सुरुवातीला काही चेंडू कमी वेगाने टाकण्यास सांगून ते चेंडू पायाने टोलवले. चेंडूचा मार लागू नये म्हणून मित्रांनीच आनंदच्या पायाला चप्पल बांधली. त्यामुळे चेंडूचा मार पायाला लागत नव्हता. त्यामुळे आनंदचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. हात नसतानाही उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी करत आनंद क्रिकेटचे मैदान गाजवतोय.

फुटबॉलचे सामने पाहताना सुचली पायाने बॅटिंग करायची आयडिया nआनंदला मित्रांनी सुरुवातीला चेंडू फेकण्यासाठी प्रेरित केले. पण बॅटिंगचं काय ते कसं करायचं, असा प्रश्न होता. बॅटिंग करण्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. फुटबाॅलचे सामने पाहत असताना त्याला अचानक पायानेच बॅटिंग करण्याचे सुचले. nत्यानुसार त्याने पायाचा बॅटसारखा वापर सुरू केला. त्यासाठी मित्रांनी त्याला मदत केली. त्यामुळे बॅटिंगची प्रॅक्टिस जोरदार झाली आणि आनंद त्यांच्या क्रिकेट टीममधील उत्तम फलंदाज झाला. आनंद फलंदाजीसाठी मैदानात उतरणार म्हटल्यावर त्याच्या मित्रांसह बघ्यांनाही मोठी उत्सुकता असते.   

टॅग्स :pimpri-acपिंपरी