शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्रात मुलींमध्ये भीतीचे वातावरण- चित्रा वाघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 20:37 IST

बोरी प्रकरणी पोलिसांनी आई-वडिलांचा पुरवणी जबाब घ्यावा, याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी

बारामती: राज्यात सुशिक्षित, हुशार मुली छेडछाडीस कंटाळून आत्महत्या करीत आहेत. मुलींवर, महिलांवर अत्याचार होत आहेत. कुठे आहेत पोलीस? कुठे आहेत त्यांचे दामिनी स्कॉड? खंडणी वसुलीमध्ये गुंतलेल्या महाविकासआघाडी सरकारला मुलींच्या, महिलांच्या रक्षणाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे महाराष्ट्रात मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी केला.

इंदापूर तालुक्यातील बोरी येथे सोमवारी ( दि.17) भिटे कुटुंबीयांची भेट घेऊन भाजप नेत्या चित्रा वाघ व पुणे जिल्हा परिषदेचे सदस्या अंकीता पाटील ठाकरे यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीने छेडछाडीस कंटाळून चार दिवसापूर्वी आत्महत्या केली. सदर घटना एका दिवसांमध्ये घडलेली नाही. पोलिसांनी व समाजाने दखल घेतली असती तर मुलीचा आत्मविश्वास वाढला असता. या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ही घटना शरमेची बाब आहे. गेल्या चार दिवसात महाराष्ट्रात अशा दोन घटना घडल्या आहेत. मालेगाव येथील आशियानेही अशीच जीवनयात्रा संपवली आहे. महाविकास आघाडीचे शासन गांभीर्याने या घटना घेत नाही. महाराष्ट्रात घडलेल्या या घटना अतिशय दुर्दैवी आहे. भविष्यात अशा घटना घडतात कामा नयेत, असे वाघ यांनी सांगितले.

बोरी प्रकरणी पोलिसांनी आई-वडिलांचा पुरवणी जबाब घ्यावा, याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. महिलांचे सशक्तीकरण होत असताना, सर्व क्षेत्रात महिला पुढे येत असताना महिलांचे रक्षण करण्यास महाविकास आघाडी  सरकार अपयशी ठरत असल्याची टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. यावेळी इंदापूर तालुका भाजपा अध्यक्ष अँड. शरद जामदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेChitra Waghचित्रा वाघMahavikas Aghadiमहाविकास आघाडीIndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीBaramatiबारामती