शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
2
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
3
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
4
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
5
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
6
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
7
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
8
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
9
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
10
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
11
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
12
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
13
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
14
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
15
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
16
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
17
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
18
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
19
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
20
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील बोरघर ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन; सरपंचांना राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट सरपंच पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 13:25 IST

सुमारे पाच ते सहा हजार लोकसंख्या असणारे हे गाव बारा वाड्या वस्त्यांमध्ये विखुरले आहे

डिंभे: केंद्र सरकारकडून प्रदान करण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार २०२५ हा पुरस्कार बोरघर ता. आंबेगाव येथील लोकनियुक्त सरपंच विजय जंगले यांना नुकताच प्राप्त झाला आहे. तर आदिवासी भागातील ग्रामपंचायत असूनही मागील दोन वर्षात या ग्रामपंचायतीने उत्कृष्ट काम केल्यामुळे मानाचे समजले जाणारे आयएसओ  मानांकनी या ग्रामपंचायतीने प्राप्त केले आहे. नुकताच दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रिय रेल्वे राज्य मंत्री व्ही. सोमन्ना यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून बोरघर ग्रामपंचायतीच्या या सर्वोच्च कामगिरीबद्दल परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

 आंबेगाव तालुक्याचे आदिवासी भागातील बोरघर या ग्रामपंचायत नुकतेच आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. येथील लोकनियुक्त सरपंच विजय जंगले यांना मानाचा समजला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार २०२५ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सुमारे पाच ते सहा हजार लोकसंख्या असणारे हे गांव बारा वाड्यावस्त्यांमध्ये विखुरले आहे. दोन वर्षांपूर्वी सरपंच पदावर निवडून आल्यानंतर त्यांनी गावातील अनेक कामे मार्गी लावली आहेत. ग्रामपंचायतीच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले असून 

काळभैरवनाथ ग्रामविकास संघ बोरघर यांच्या वतीने सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा नुकताच जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी राजीव नंदकर अप्पर जिल्हाधिकारी यशोदा पुणे, भैरवनाथ ग्रामविकास संघाची अध्यक्ष राजू वाळकोळी, माझी विक्रीकर उपायुक्त डी.बी.घोडे मनपा अभियंता वनराज बांबळे, उपसरपंच राजू घोडे,सचिव विष्णू घोडे, पोलीस पाटील जमुना शेळके, सुभाष शेळके, सुधाकर खामकर, बबन बांबळे दगडू बांबळे, देवराम शेळके, दीपक वाळकोळी, काशिनाथ घोडे, ग्रामविस्तार अधिकारी संजय जोशी, शांताराम कोकणे ,रामदास कोकणे, जयसिंग भांबळे, जगन नंदकर, पिलाजी वाळकोळी, इत्यादी मान्यवर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ambegaon's Borghar Panchayat Receives ISO Ranking; Sarpanch Honored Nationally

Web Summary : Borghar Gram Panchayat in Ambegaon taluka received ISO ranking and Sarpanch Vijay Jangale was awarded the Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar Rashtriya Utkrisht Sarpanch Puraskar 2025 for outstanding work. The award was presented in Delhi, recognizing the village's development despite being in a tribal area.
टॅग्स :PuneपुणेambegaonआंबेगावSocialसामाजिकgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर