बोपदेव घाटात प्रेमीयुगुलाला लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:12 IST2021-08-19T04:12:43+5:302021-08-19T04:12:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फिरायला गेलेल्या युगुलापैकी तरुणीवर तिघा चोरट्यांनी वार करून त्यांच्याकडील ऐवज जबरदस्तीने लुटून नेण्याचा प्रकार ...

Bopadev robbed Premiyugula in the ghat | बोपदेव घाटात प्रेमीयुगुलाला लुबाडले

बोपदेव घाटात प्रेमीयुगुलाला लुबाडले

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : फिरायला गेलेल्या युगुलापैकी तरुणीवर तिघा चोरट्यांनी वार करून त्यांच्याकडील ऐवज जबरदस्तीने लुटून नेण्याचा प्रकार बोपदेव घाटात घडला आहे़

याप्रकरणी ताडीवाला रोड येथे राहणाऱ्या एका २९ वर्षांच्या तरुणाने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना बोपदेव घाटात सोमवारी रात्री ११ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण आपल्या मैत्रिणीसह सोमवारी बोपदेव घाटात फिरायला गेले होता. रात्री उशिरापर्यंत घाटात फिरल्यानंतर ते खाली उतरत होते. यावेळी तरुणी नैसर्गिक विधीसाठी बाजूला गेली होती. त्याचवेळी तिघा चोरट्यांनी तिच्यावर चाकूने वार करून जखमी केले. तिच्या गळ्यातील २५ हजार रुपयांची सोनसाखळी, फिर्यादी तरुणाकडील १ हजार रुपये रोख व पाकीट असा २६ हजार १०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Bopadev robbed Premiyugula in the ghat