शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला 'बूस्टर' ; इतिहासात प्रथमच तेराशे कोटींचा कर जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 11:06 IST

नऊ महिन्याच्या कालावधीत सुमारे ७ लाख २९ हजार १७३ मिळकतधारकांनी १ हजार ३०१ कोटी २५ लाख रूपये मिळकतकर भरला आहे.

पुणे : कोरोना आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पुणे महापालिकेला, मिळकतकर आकारणी विभागाने मोठा बुस्टर दिला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यातच तब्बल १ हजार ३०० कोटी रूपयांचे उत्पन्न या विभागाने मिळवून दिले आहे.

कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गत आर्थिक वर्षात म्हणजे सन २०१९-२० मध्ये संपूर्ण वर्षात १ हजार २९२ कोटी रूपये मिळकत कर जमा झाला होता.मात्र यावर्षी पहिल्या नऊ महिन्यात म्हणजे ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच तब्बल १ हजार ३०० कोटी रूपये मिळकतकर जमा झाला आहे. विशेष म्हणजे या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला सुमारे दीड महिना लॉकडाऊनमुळे कर भरणा केंद्रे बंद होती. तर या खात्यातील सर्व सेवकवर्ग पाच-सहा महिने कोरोना आपत्ती निवारण कामकाजात व्यस्त होते़  अशावेळी आॅनलाईन कर भरण्यासाठी केलेले आवाहन व मिळकत करावरील शास्तीतील (व्याज) सवलत देणारी राबविलेली ‘अभय योजना’ यामुळे आपत्ती काळातही पुणे महापालिकेला इतिहासात प्रथमच तेराशे कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

१ एप्रिल ते ३१ डिसेंबर,२०२० या नऊ महिन्याच्या कालावधीत सुमारे ७ लाख २९ हजार १७३ मिळकतधारकांनी १ हजार ३०१ कोटी २५ लाख रूपये मिळकतकर भरला आहे.यामध्ये ७६़२६ टक्के कर रक्कम ही आॅनलाईन जमा झाली आहे. मागील वर्षी पहिल्या नऊ महिन्यात १ हजार ९२ कोटी ८४ लाख रूपये मिळाले होते.

‘अभय योजने’तून २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान महापालिकेला ३५१ कोटी १८ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले असून, या योजनेला आता जानेवारी,२०२१ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याने, १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर,२०२० या कालावधीत ७० कोटी २६ लाख मिळकत कर मिळाला असल्याचेही विलास कानडे यांनी सांगितले. 

-----------------------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTaxकरcorona virusकोरोना वायरस बातम्या