शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

Ganeshotsav 2022: आतुरता गणरायाच्या आगमनाची..! पुण्यात बाप्पाच्या मुर्त्यांची बुकिंग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 10:49 IST

यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पीओपीच्या मुर्त्यांचे प्रमाण सर्वाधिक

शिवानी खोरगडे

पुणे: गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सणउत्सव निर्बंधात साजरे करावे लागले. पण यंदाच्या वर्षी निर्बंध मुक्त झाल्यानं सर्वच धर्मीय सणउत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरे करत आहेत. पुढच्या महिन्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. कारण दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. त्यामुळे दोन महिन्यांआधीच शहरात वातावरण तयार झालं आहे. गणेशोस्तवासाठी लागणाऱ्या मुर्त्यांचं काम हे अंतिम टप्प्यात आलं आहे. पण यंदा महागाईचा फटका हा मुर्त्यांवर बसला असून १० टक्के वाढ ही मुर्त्यांच्या किंमतीत झाली आहे. 

 गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात गणेशोत्सव साजरा केला गेला. पण यंदा निर्बंध मुक्त झाल्याने शहरात गणेशोत्सव मंडळ तसेच नागरिक गणेशोत्सवाच्या तयारीला लागले आहे. गणेशोत्सवासाठी बाप्पाच्या मूर्तीचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. दोन वर्ष ५० टक्क्यांपेक्षा कमी मूर्ती विकल्या गेल्याने आर्थिक संकटात असलेल्या मुर्तीकारांना यंदा मात्र अच्छे दिन येणार असल्याचे चित्र दिसत आहे. 

महागाईचा मूर्ती विक्रीवर देखील फटका

गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू तसेच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. वाढत्या महागाईमुळे मूर्तीसाठी लागणारे साहित्य देखील महाग झाल्याने यंदा मुर्त्यांच्या किंमतीमध्ये दहा टक्के एवढी वाढ झाली आहे. तसेच यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पीओपीच्या मुर्त्यांचा प्रमाण हे अधिक असल्याचं यावेळी मूर्ती विक्रेते श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय.  यंदाही पुणे शहरात मानाचे गणपती, दगडूशेठ, विठ्ठलाच्या मूर्तीचा क्रेझ

 डिसेंबर महिन्यापासूनच मूर्तिकार हे बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी तयारीला लागतात. पण मागील दोन वर्ष कोरोनामुळे बाप्पाच्या मूर्ती हे कमी प्रमाणात विक्रीला गेल्याने ५० टक्के मुर्त्या शिल्लक होत्या. तर काही नवीन मुर्त्या देखील यंदाच्या वर्षी बनविण्यात आल्या आहेत. यंदाच्या वर्षी देखील पुणे शहरात मानाच्या बाप्पाच्या मूर्ती तसेच दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती आणि विशेष करून विठ्ठलाच्या मूर्तीचा क्रेझ असून नागरिक आतापासूनच मूर्तीसाठी बुकिंग करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवTempleमंदिरSocialसामाजिक