पालिका दवाखान्यात गर्भधारणा चाचणी मोफत
By Admin | Updated: July 9, 2014 23:42 IST2014-07-09T23:42:20+5:302014-07-09T23:42:20+5:30
एचआयव्ही तपासणी सर्वाना मोफत करण्याच्या प्रस्तावाला महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत आज (बुधवार) मान्यता देण्यात आली.

पालिका दवाखान्यात गर्भधारणा चाचणी मोफत
पुणो : महापालिकेच्या दवाखान्यात महिलांची गर्भधारणा चाचणी (प्रेगन्सी टेस्ट) व एचआयव्ही तपासणी सर्वाना मोफत करण्याच्या प्रस्तावाला महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत आज (बुधवार) मान्यता देण्यात आली. मातृदिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात आला.
शहरातील विविध भागांत महापालिकेचे दवाखाने व प्रसूतिगृहे आहेत. सध्या महापालिकेच्या दवाखान्यात गर्भधारणा चाचणीसाठी 7क् रुपये आणि एडस् तपासणीसाठी 1क्क् रुपयांचे शुल्क आकारले जाते. प्रत्यक्षात मेडिकलमध्ये प्रेग्नसी किट 5क् रुपयांना उपलब्ध आहे. शासनाच्या दवाखान्यात माता व बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत ही सुविधा मोफत आहे. महिला सबलीकरण आणि जनजागृतीच्या दृष्टीने गर्भधारणा चाचणी सहज व मोफत उपलब्ध होणो गरजेचे आहे. तसेच, राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एचआयव्ही तपासणीही मोफत आहे. त्या पाश्र्वभूमीवर महापालिकेच्या सर्व दवाखान्यांत गर्भधारणा चाचणी व एचआयव्ही तपासणी मोफत देण्याचा प्रस्ताव नगरसेविका मनीषा घाटे यांनी दिला होता. महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत एकमताने त्याला बुधवारी मान्यता देण्यात आली. लवकरच हा प्रस्ताव स्थायी समितीला पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती मनीषा घाटे यांनी दिली.(प्रतिनिधी)