शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बच्या अफवेने खळबळ

By admin | Updated: March 3, 2015 01:16 IST

सिंहगड रस्त्यावर आढळलेल्या बेवारस पिशवीमुळे बॉम्ब सापडल्याची अफवा पसरली होती. पोलिसांनी घेतलेल्या मॉक ड्रीलमुळे जवळपास तासभर सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी झाली होती.

पुणे : सिंहगड रस्त्यावर आढळलेल्या बेवारस पिशवीमुळे बॉम्ब सापडल्याची अफवा पसरली होती. पोलिसांनी घेतलेल्या मॉक ड्रीलमुळे जवळपास तासभर सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी झाली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) तपासणी केल्यानंतर या पिशवीत एक स्टॅबीलायझर मिळून आला. सिंहगड रस्त्यावरील स्वामी विवेकानंद विद्यामंदिराशेजारी बसथांब्याच्या पदपथावर सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एक बेवारस पिशवी मिळून आली होती. याबाबतची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. पोलिसांना माहिती मिळताच बीडीडीएसला पाचारण करण्यात आले. दत्तवाडी आणि सिंहगड रोड पोलिसांनी याठिकाणी तातडीने बंदोबस्त देऊन जागा रिकामी करुन घेतली. रस्त्याच्या एका बाजुची वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. बीडीडीएसच्या जवानाने बॉम्ब सुट परीधान करुन दोरीच्या सहाय्याने पिशवी उघडली. त्यामध्ये आढळून आलेल्या स्टॅबीलायझरचे मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने स्कॅनिंग करण्यात आले. कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाल्यावर हे मॉक ड्रील थांबवण्यात आले. हे संपुर्ण ड्रील सुरु असताना बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अनेकांनी व्हॉट्स अ‍ॅपवरुनच तेथील फोटो काढून पाठवून दिले. तसेच बॉम्ब सापडल्याचा संदेशही प्रसारीत करायला सुरुवात केली. त्यामुळे सिंहगड रस्त्यावर बॉम्ब सापडल्याची अफवा पसरली होती.