शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

कचरा वेचणाऱ्या तिघांवर उकळते पाणी फेकले, दोघांचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 17:42 IST

ही हृदयद्रावक घटना गेल्या आठवड्यात घडली, मात्र मंगळवारी पीडितेच्या मृत्यूनंतर प्रकरण समोर आले.

पुणे: माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. कचरा उचलण्यासाठी गेलेल्या तीन जणांवर हॉटेलच्या कर्मचाऱ्याने उकळते पाणी फेकले. यामध्ये गंभीर भाजल्याने दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीरावस्थेत रुग्णालयात दाखल आहे. पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली असून हॉटेल सील करण्याची तयारीही सुरू आहे.

ही हृदयद्रावक घटना गेल्या आठवड्यात घडली होती, मात्र मंगळवारी पीडितेच्या मृत्यूनंतर हे प्रकरण उघडकीस आले. पुण्यातील सासवड परिसरात 25 मे रोजी ही घटना घडली होती. हॉटेलचालक नीलेश उर्फ ​​पप्पू जगताप याच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. स्थानिक आमदाराच्या दबावाखाली पोलीस आरोपींवर कारवाई करत नसल्याचा आरोप लोक करत आहेत. हॉटेलचालक सध्या फरार आहे.

पीडित महिलेचा व्हिडिओ समोर आला या घटनेची माहिती देताना एका वृद्ध महिलेचा कचरा उचलतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ घटनेनंतरचा आहे. श्वेताबाई असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. जखमी अवस्थेत त्या त्यांच्यावरील आपबीती सांगत आहेत. रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. या व्हिडिओच्या आधारे सासवड पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्याला अटक केली. या घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पायऱ्यांवर बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या हातावर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे दिसत आहे.

पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर ही घटना घडलीसासवड पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर ही घटना घडली. त्यामुळेच पोलिस हे प्रकरण लपवत असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस निरीक्षक कदम यांनी सांगितले की, पप्पू जगताप यांच्या हॉटेलजवळील अहिल्या देवी मार्केटमध्ये तीन कचरा वेचक बसले होते. याचा राग येऊन पप्पू जगताप नावाच्या व्यक्तीने आधी तिघांना काठीने मारहाण केली आणि नंतर त्यांच्या एका कर्मचाऱ्याला त्या तिघांवर उकळते पाणी फेकण्यास सांगितले. गंभीररित्या भाजल्यानंतर आरोपी तिघांना मरणासाठी सोडून तेथून निघून गेला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस