शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या दिवसात उकडतंय; राज्यात ऐन हिवाळ्यात तापमानात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 15:13 IST

महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा आणणारे ठरले आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसात राज्यात उकाडा जाणवत आहे. ही परिस्थिती आणखी तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ९.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३३.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्यात किंचित वाढ झाली आहे. त्याचवेळी विदर्भात किंचित घट झाली आहे.

पुण्यात सध्या दिवसा, सायंकाळी आणि रात्री काही अंशी ढगाळ वातावरण अनुभवायला येत आहे. दिवसा अंशत: ढगांच्या उपस्थितीमुळे दिवसाच्या तापमानात कोणतीही घट होत नाही. परंतु रात्रीचे तापमान वाढत आहे. रात्रीच्या वेळी ढगांचे आवरण वातावरणात ब्लँकेट म्हणून काम करते. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या दीर्घ लहरी किरणोत्सर्गापासून वातावरणात जाण्यास प्रतिबंध करते. त्यामुळे रात्रीच्या तापमानात वाढ होते.गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्हा तसेच दक्षिण-मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आर्द्रतेच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. तसेच पूर्वेकडील बंगालच्या उपसागरातून, दक्षिण द्वीपकल्पीय भागातून बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्याच्या प्रभावामुळे राज्यातील तापमानात वाढ होत आहे. ही परिस्थिती आणखी तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा थंडीत वाढ होऊ शकते.

रविवारी पुण्यात १८.१ अंश किमान तापमानाची नोंद झाली होती. पुढील तीन दिवस कमाल व किमान तापमान ३३/१७ अंशांच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनSocialसामाजिकTemperatureतापमान