शरीरसुखाची मागणी करून उकळली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:12 IST2021-05-10T04:12:12+5:302021-05-10T04:12:12+5:30

पुणे : तरुणीकडे शरीरसुखाची मागणी करून आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्याकडून ८५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एकाला मार्केट ...

Boiled ransom by demanding bodily pleasures | शरीरसुखाची मागणी करून उकळली खंडणी

शरीरसुखाची मागणी करून उकळली खंडणी

पुणे : तरुणीकडे शरीरसुखाची मागणी करून आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्याकडून ८५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एकाला मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली आहे. कुतुबुद्दीन हबीब काचवाला (वय २३, रा. कसबा पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २१ वर्षांच्या तरुणीने मार्केट यार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी हे २०१६ मध्ये एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. त्या वेळी या तरुणीने काचवाला याला तुझ्यासोबत रिलेशन ठेवू शकत नाही, असे सांगितले होते. तरीही त्याने तिला तुला माझ्यासोबत लग्न करावे लागेल, अशी धमकी दिली. तू जर दुसऱ्यासोबत लग्न केले तर त्या मुलाला व तुझ्या आई-वडिलांना जिवे ठार मारून टाकील, अशी धमकी दिली. याचदरम्यान या तरुणीकडे वेळोवेळी पैशांची मागणी करुन आतापर्यंत तिच्याकडून ४० हजार रुपये रोख व सोन्याची साखळी असा ८५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन वारंवार भेटून तिला शरीरसुखाची मागणी केली. शेवटी त्याच्या त्रासाला कंटाळून या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी काचवाला याला अटक केली आहे.

Web Title: Boiled ransom by demanding bodily pleasures