बोगस डॉक्टरला पर्वती येथे अटक
By Admin | Updated: June 24, 2014 23:03 IST2014-06-24T23:03:51+5:302014-06-24T23:03:51+5:30
रूमा क्लिनिक नावाचा दवाखाना सुरू करून रुग्णांची फसवणूक करीत असलेल्या बोगस डॉक्टरला महापालिकेच्या अधिका:यांनी छापा टाकून अटक केली.

बोगस डॉक्टरला पर्वती येथे अटक
>पुणो : कोणतीही वैद्यकीय पदवी न घेता पर्वती येथे रूमा क्लिनिक नावाचा दवाखाना सुरू करून रुग्णांची फसवणूक करीत असलेल्या बोगस डॉक्टरला महापालिकेच्या अधिका:यांनी छापा टाकून अटक केली. पर्वती पायथा येथे दुपारी साडेचारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
नारायण पशुपती मलिक (वय 32, रा. 248, पर्वती पायथा, मूळचा पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी कल्पना संजय बळीवंत (रा. रविराज हेरिटेज, बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे.
मलिककडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना तो व्यवसाय करीत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते गणोश बो:हाडे यांनी केली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी महापालिकेच्या आरोग्य अधिका:यांनी रूमा क्लिनिकवर छापा टाकला. त्या वेळी त्याच्याकडे वैद्यकीय पदवी प्रमाणपत्रंची विचारणा करण्यात आली; मात्र त्याला कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र दाखविता आले नाही. रुग्णांवर उपचार करून तो
फसवणूक करीत होता. स्वारगेट ठाण्याचे सहायक निरीक्षक पी.
एम. कठाणो या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)