उरुळी कांचनच्या शिवेजवळील उसाच्या शेतामध्ये आढळला तरुणाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 19:08 IST2017-12-19T19:04:43+5:302017-12-19T19:08:01+5:30
उरुळी कांचनच्या शिवेजवळ ढमढेरे यांच्या उसाच्या शेतामध्ये आज सकाळी २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे

उरुळी कांचनच्या शिवेजवळील उसाच्या शेतामध्ये आढळला तरुणाचा मृतदेह
उरुळी कांचन : उरुळी कांचनच्या शिवेजवळ ढमढेरे यांच्या उसाच्या शेतामध्ये आज सकाळी २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, आतमध्ये निळ्या रंगाचा बर्मुडा, निळ्या रंगाचा चौकटी शर्ट आणि सडपातळ शरीरयष्टी असे त्याचे वर्णन आहे. या तरुणाविषयी काही माहिती असल्यास त्यांनी उरुळी कांचन पोलीस चौकी किंवा लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उरुळी कांचन येथील सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी केले आहे. या घटनेचा तपास लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कौंडूभैरी व इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.