शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वारज्यात चेंबरमध्ये आढळला पस्तीस वर्षीय महिलेचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 21:00 IST

साधारण आठवड्यापूर्वी नदीकाठी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविणे अद्याप बाकी असताना वारज्यात पुन्हा एका महिलेचा मृतदेह सापडल्याने पोलीसही चक्रावले आहेत.

पुणे (वारजे) :  साधारण आठवड्यापूर्वी नदीकाठी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविणे अद्याप बाकी असताना वारज्यात पुन्हा एका महिलेचा मृतदेह सापडल्याने पोलीसही चक्रावले आहेत. आता येथील गार्डन सिटी मागे म्हाडा (बीएसयूपी) कॉलनी परिसर रस्त्यालगत असलेल्या चेंबरमध्ये एका पस्तीस वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे.परिसरातील नागरिकांना वास आल्याने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण आणि वारजे पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, यांनी सहकार्‍यांसाह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदरील मृत अनोळखी महिलेच्या अंगात मेहंदी रंगाचा पंजाबी ड्रेस आहे. सदरील महिलेचा खून करून विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने हा मृतदेह अंदाजे चार ते पाच दिवसांपूर्वी चेंबर मध्ये टाकला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.चार पाच दिवस पाण्यात राहिल्याने चेंबर मधील हा मृतदेह फुगलेला व काही प्रमाणात सडलेल्या अवस्थेत असून महिलेचा हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर सदरील मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु असून पुढील तपास वारजे माळवाडी पोलिस करीत आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वीच वारजे येथील मुठा नदीपात्रामध्ये नायलॉनच्या बॅगमध्ये तरुणाचामृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती आठवडाभर प्रयत्न करूनही अद्यापा त्याचा सुगावा लागला नाही. सगळीकडे छायाचित्र प्रसिध्द करूनही अद्यापपर्यंत याचा छडा लावण्यात पोलिसांना यशआलेले नाही.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीWarje Malwadiवारजे माळवाडीPoliceपोलिस