शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

शहीद मेजर शशीधरन नायर यांचे पार्थिव पुण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 08:07 IST

आज होणार अंत्यसंस्कार : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या स्फोटात वीरमरण

पुणे : सीमेवर भारतभूमीची सुरक्षा करताना वीरमरण आलेले मेजर शशीधरन नायर (३२) यांचे पार्थिव शनिवारी सायंकाळी घोरपडीतील राष्ट्रीय युध्द स्मारकावर आणण्यात आले. तेव्हा ‘शहीद मेजर नायर अमर रहे’ अशा घोषणांसह सलामी देण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात नायर शहीद झाले.

मूळचे केरळचे असणाऱ्या मेजर शशीधरन यांचे कुटुंब सध्या खडकवासला परिसरात कृष्णा हाईट्स इमारतीत वास्तव्यास आहेत. शशीधरन यांनी केंद्रीय विद्यालयात शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असताना त्यांनी एनसीसीमध्ये सहभाग घेऊन ‘उत्कृष्ट स्नातक’ किताब पटकावला होता. सध्या ते गोरखा राफलमध्ये कार्यरत होते. २००७ मध्ये डेहराडून येथील रक्षा अकादमीमधून प्रशिक्षण पूर्ण करून ते लष्करात दाखल झाले होते. त्यांच्या ११ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेत नेत्रदीपक कामगिरी केली.

संध्याकाळी त्यांचे पार्थिव पुण्यातील दक्षिण मुख्यालयातील वॉर मेमोरियल येथे आणण्यात आले. तिथे त्यांचे कुटुंबीय तसेच लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. नायर यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांच्यामागे आई, पत्नी आणि बहीण असा परिवार आहे. त्यांची बहीण अविवाहित असून वृद्ध आई व पत्नीची जबाबदारी पेलण्यास आता घरात कोणीही नाही. शुक्रवारी दुपारी त्यांचा आलेला फोन शेवटचाच ठरला.लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार

नायर यांचे पार्थिव रात्री सदन कमांड येथील रुग्णालयात रात्रभर ठेवण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी सात वाजता त्यांच्या खडकवासला भागातील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशान भूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPuneपुणे