बोरी परिसरात वादळासह अवकाळी पाऊस

By Admin | Updated: May 5, 2017 02:22 IST2017-05-05T02:22:52+5:302017-05-05T02:22:52+5:30

बोरी (ता. इंदापूर) परिसरात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावली. दिवसभर उन्हाचा तडाका

Blowing rain in the sack area | बोरी परिसरात वादळासह अवकाळी पाऊस

बोरी परिसरात वादळासह अवकाळी पाऊस

काझड : बोरी (ता. इंदापूर) परिसरात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावली. दिवसभर उन्हाचा तडाका जाणवत असतानाच आकाशात काळे ढग जमा होवून ढगांच्या गडगाड आवाजात अचानक पावसाने दुपारच्या वेळी तासभर पावसामुळे सगळीकडे पाणी पाणी झाले. अचानक पावसामुळे ठिकठिकाणी खड्यात पाणी साचले आहे. अचानक पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच ताराबंळ उडाली. शेतामध्ये असलेली उभे पिके पडझड झाली.
शेतावर असलेल्या कांदा तसेच जनावरांची चारा वैरण पावसाने भिजले आहे. ते छाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी लगबग दिसम लागली. अचानक पावसामुळे उकाड्याची गर्मी कमी झाली. उकाड्या पासून काही दिलासा ही मिळाला आहे. शेतकऱ्यांनी वाळवत ठेवलेल्या मका पावसामुळे भिजल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Blowing rain in the sack area