शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या अस्तित्वावर वन विभागाची मोहोर : कात्रज घाट परिसरात पुन्हा दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 12:10 IST

गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या सातत्याने दर्शन होत असल्याचे समोर आले.

ठळक मुद्दे वन क्षेत्रात न जाण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे : कात्रज येथील गुजरवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने सोमवारी (दि. ८) प्रसिद्ध केले होते. कात्रज येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.९) या परिसराची पाहणी करीत बिबट्याचे अस्तित्व असल्याचे मान्य केले. वन क्षेत्रातच बिबट्याचा वावर असून, नागरिकांनी जंगल परिसरात जाऊ नये असे आवाहनही विभागाच्या वतीने केले आहे. 

कात्रजकडून जुन्या बोगद्याकडे जाताना, गुजरवाडी गावाचा फाटा लागतो. महामार्गावरुन सुमारे सहा ते सात किलोमीटरवर असलेल्या आडबाजुच्या गोठ्याबाहेर रविवारी एका कुत्र्याला जनावराने नेल्याची माहिती लोकमत ला मिळाली होती. प्राणीमित्रांसमवेत त्याची शहानिशा केल्यावर या वृत्तात तथ्य आढळले. गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या सातत्याने दर्शन होत असल्याचे समोर आले. रविवारच्या घटनेनंतर सोमवारी (दि. ८) देखील बिबट्याने समर्थगड फौंडेशनच्या आवारातील तळ्यावर सायंकाळी सात ते सव्वासातच्या सुमारास हजेरी लावली.  वनरक्षक स्वाती खेडकर व वनसेवक संभाजी धनावडे यांच्या पथकाने मंगळवारी या ठिकाणाची पाहणी केली. प्राणीमित्र अभिषेक खंडेलवाल व समर्थगड फौंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते.तळ्याच्या काठाजवळ बिबट्याच्या पावलांचे ठसे वन विभागाच्या पथकाला आढळले. अंदाजे तीन वर्षे वयाचा हा बिबट्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याच बरोबर तळ्यावर तरस, भेकर, काळवीट, रानडुक्कर व मोराच्या पावलांचे ठसे आढळून आले. वाढता उन्हाळा व जंगलातील पाण्याच्या दुर्भिक्षामुळे बिबट्या तळ्यावर येत असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.   -- दोन महिन्यांपूर्वी गायीच्या वासराला मारलेबिबट्याचा वावर गेल्या दोन महिन्यांपासून वाढला असला तरी १३ जुलै २०१८ रोजी बिबट्याच्या पाऊल खूणा वनविभागाला मिळाल्या होत्या. त्यानंतर मात्र, बिबट्याचे दर्शन झाले नाही. दोन महिन्यांपूर्वी समर्थगड फौंडेशनच्या आवारातील गायीच्या वासराला बिबट्याने मारले होते. जवळपास सहा फुटी तारेचे कुंपण पार करुन बिबट्या आत आला होता. त्याला वासराला नेता आले नाही. अर्धवट खाल्लेले वासरु आवारात आढळले. वासराच्या जवळ बिबट्याच्या पाऊल खूणा असल्याचे यावेळी दिसून आले होते. ---या परिसरामध्ये बिबट्याचे अस्तित्व आहे. त्यामुळे महिन्यापूर्वी ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांना जंगलात न जाण्याबाबत आवाहन केले आहे. ही बाब वरीष्ठांना कळविण्यात येईल. जंगल परिसरातच बिबट्या वावरत आहे. नागरिकांनी जंगल परिसरात जाऊ नये, तसेच जनावरे चारण्यास नेऊ नये. -स्वाती खेडकर, वनरक्षक कात्रज 

 

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजleopardबिबट्याforest departmentवनविभाग