रक्तदान ही चळवळ व्हावी : स्वाती पाचुंदकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:15 IST2021-09-06T04:15:13+5:302021-09-06T04:15:13+5:30
रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामर्थ्य आहे चळवळीचे व राजमुद्रा ...

रक्तदान ही चळवळ व्हावी : स्वाती पाचुंदकर
रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामर्थ्य आहे चळवळीचे व राजमुद्रा पतसंस्थेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाळासाहेब पाचुंदकर, शिवाजी शेळके, प्रदेश जनता दलाचे कार्याध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, माजी जि. प. सदस्य शेखर पाचुंदकर, माजी सभापती विश्वास कोहकडे, आंबेगाव शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर, अमोल जगताप, वि. का. संस्थेचे अध्यक्ष केरूभाऊ कुटे, अजित कोहकडे, उद्योजक शुभम नवले, संदीप नवले, डॉ. प्रशांत दौंडकर, डॉ. अंकुश लवांडे, चंद्रशेखर दरवडे, सुहास काटे, रावसाहेब पाचुंदकर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रादेशिक रक्तपेढी, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे रक्तपेढीच्या साहाय्याने ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे डॉ. शरद देसले यांनी सांगितले. सूत्रसंचालन सुनील लांडे यांनी केले. सुनील सोनवणे यांनी आभार मानले.
050921\img_20210905_161635.jpg
??????? ???????? ?????? ?????? ???????