आमदार रोहित पवार यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:10 IST2021-04-11T04:10:54+5:302021-04-11T04:10:54+5:30

बारामती : कोविडच्या काळात सध्या मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा असल्याने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वत: रक्तदान करून आमदार ...

Blood donation by MLA Rohit Pawar | आमदार रोहित पवार यांचे रक्तदान

आमदार रोहित पवार यांचे रक्तदान

बारामती : कोविडच्या काळात सध्या मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा असल्याने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वत: रक्तदान करून आमदार रोहित पवार यांनी आदर्श वस्तुपाठ मांडला आहे.

यावेळी आमदार पवार यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले. सध्या बारामतीच्या ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा असल्याने गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करणे अशक्य झाले आहे. मात्र आमदार पवार यांनी स्वत: रक्तदान करून रक्तदान करण्याचे अवाहन केल्याचा आदर्श ठेवला. तसेच यापुढे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. के. सिसोदिया तसेच जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे तसेच ब्लड बँकेचे कर्मचा-यांनी त्यांचे स्वागत केले.

———————————————————

फोटोओळी—आमदार रोहित पवार यांनी

बारामती येथील ब्लड बँकेत रक्तदान केले.

—————————————————

१००३२०२१ बारामती—१९

——————————————

Web Title: Blood donation by MLA Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.