ओतूर महाविद्यालयात रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:27 IST2021-01-13T04:27:08+5:302021-01-13T04:27:08+5:30
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना, विभाग डॉक्टर्स असोसिएशन ओतूर ,व ...

ओतूर महाविद्यालयात रक्तदान शिबिर
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना, विभाग डॉक्टर्स असोसिएशन ओतूर ,व पुणे ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते २२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ टी एन साळवे, उपप्राचार्य डॉ एस एफ ढाकणे, के डी सोनवणे व ज्येष्ठ प्रा डॉ व्ही एम शिंदे, डॉ डी एम टिळेकर, डॉ आर एन कसपटे , डॉ एस डब्लु वाळके, डॉ एन एन उगले आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अमोल बिबे, डॉ निलेश काळे, अजय कवाडे, डॉ शितल कलापुरे, डॉ भुषण वायकर, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख डॉ .निलेश हांडे तसेच प्रशासकीय कर्मचारी अजित
डुंबरे व सचिन डुंबरे यांनी विशेष परिश्रम घेतले.