बलिदान दिनानिमित्त खडकीत रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:13 IST2021-03-26T04:13:31+5:302021-03-26T04:13:31+5:30
पुणे महापालिकेचे स्थायी समिती हेमंत रासने व संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे यांच्या हस्ते शहिदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ...

बलिदान दिनानिमित्त खडकीत रक्तदान शिबिर
पुणे महापालिकेचे स्थायी समिती हेमंत रासने व संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे यांच्या हस्ते शहिदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा, खडकी विभाग अध्यक्ष शिरीष रोच, इंद्रकुमार बन्सल, संदीप पवार, रमेश गावडे, मोहन काळे राष्ट्रवादीचे बाळासाहेब आहेर, शिवसेनेचे रवींद्र सोनवणे, मदन पवार, आनंद हांडे, मालोजी गादेवार, हॉकी प्रशिक्षक शरद रोच, श्रीराम मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र बागनाईक, विकास गडपल्लू व विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. पीएसआय ब्लड बँक यांच्या वतीने मिलिंद भुजबळ व वैद्यकीय पथकाने रक्त संकलन केले व रक्तदात्यांच्या रक्तगटाची तपासणी केली. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देण्यात आले. शिबिराचे प्रास्ताविक शिरीष रोच यांनी तर आभार प्रदर्शन राजेश राजपूत यांनी केल. शिबिर यशस्वी करण्याकरिता आनंद रेड्डी, प्रतीक परदेशी, दीपक चार्या, साठे, यांनी विशेष परिश्रम केले.
----------------------
फोटो ओळ: खडकी बाजार: रक्तदात्यास स्मृतिचिन्ह देताना पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने व वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्ते.