महावीर जयंतीनिमित्त राजगुरुनगरमध्ये १२४ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:11 IST2021-04-28T04:11:14+5:302021-04-28T04:11:14+5:30

जैन श्रावक संघ राजगुरुनगर, जैन धर्मार्थ हॉस्पिटल, अरिहंत पतसंस्था व जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ...

Blood donation of 124 people in Rajgurunagar on the occasion of Mahavir Jayanti | महावीर जयंतीनिमित्त राजगुरुनगरमध्ये १२४ जणांचे रक्तदान

महावीर जयंतीनिमित्त राजगुरुनगरमध्ये १२४ जणांचे रक्तदान

जैन श्रावक संघ राजगुरुनगर, जैन धर्मार्थ हॉस्पिटल, अरिहंत पतसंस्था व जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये कोरोना नियमांचे पालन करून व सामाजिक अंतराचे नियम पाळून रक्तदान शिबिर पार पडले.

रक्तदान शिबिरास अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद लाभल्याचे जैन श्रावक संघाचे अध्यक्ष व राजगुरुनगरचे माजी सरपंच प्रदीप कासवा यांनी सांगितले.

रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष व माजी सरपंच प्रदीप कासवा, जैन धर्मार्थ हॉस्पिटलचे अध्यक्ष संतोष बोथरा, अरिहंत पतसंस्थेचे अध्यक्ष सुशील शिंगवी, जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष फुलचंद ओसवाल, अमर टाटिया, चंदन खारीवाल, अजय बलदोटा, मनीष बोरा, प्रकाश गदिया, विजय भन्साळी, अजित लुणावत, सागर बलदोटा, विनय लोढा, बाबू कर्नावट, नितीन मुथा, नितीन शहा, उमेश शहा, सतीश गांधी, राहुल बटेवरा यांनी व सर्व सहकार्‍यांनी परिश्रम घेतले. रक्तदात्यांना यावेळी वाफ घेण्याचे मशीन आणि मास्क भेट देण्यात आले.

--------------------------------------------------------

फोटो क्रमांक : २७ राजगुरुनगर ब्लड डोनेशन

फोटो ओळ : राजगुरुनगर येथे भगवान महावीर जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा सत्कार करताना जैन श्रावक संघाचे पदाधिकारी

Web Title: Blood donation of 124 people in Rajgurunagar on the occasion of Mahavir Jayanti