नाकाबंदी, गस्त

By Admin | Updated: August 18, 2015 23:59 IST2015-08-18T23:59:22+5:302015-08-18T23:59:22+5:30

कामशेत येथे ग्रामपंचायत निवडणूक मतदानाच्या वेळी मनसेचे मावळ तालुकाध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी ज्ञानेश्वर वाळुंज (वय २९, रा. कामशेत) यांचा खून झाला होता

Blockade, Patrol | नाकाबंदी, गस्त

नाकाबंदी, गस्त

पिंपरी : कामशेत येथे ग्रामपंचायत निवडणूक मतदानाच्या वेळी मनसेचे मावळ तालुकाध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी ज्ञानेश्वर वाळुंज (वय २९, रा. कामशेत) यांचा खून झाला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने येथील फेर मतदान १९ आॅगस्टला घेण्याचे जाहीर केले होते. बुधवारी मतदान होणार असून, कामशेतमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. गस्त वाढविण्यात आली असून, सर्व मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त आहे.
राजकीय वैमनस्यातून यांचा ४ आॅगस्टला दुपारी १२ वाजता वाळुंज यांचा गोळ्या घालून खून झाला. या घटनेनंतर कामशेतमध्ये दगडफेक झाली होती. खडकाळे ग्रामपंचायतीच्या दहापैकी सात मतदान केंद्रांवर संतप्त जमावाने हल्ला करून तोडफोड केली होती. मतदानप्रक्रियेत व्यत्यय आल्याने जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी राज्य निवडणूक आयोगाला अहवाल पाठवून फेरनिवडणुकीची शिफारस केली होती. येथे कोणताही अनुचित प्रकार पुन्हा घडू नये,
यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. (वार्ताहर)

Web Title: Blockade, Patrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.