शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

पुणे शहरात ४२ ठिकाणी नाकाबंदी; पोलिसांकडून संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 12:44 IST

एका दिवसात ९०२ जणांवर विनामास्क कारवाई

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्रीचीसंचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी शहर पोलीस दलाने ४२ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. रात्री ११ ते पहाटे ६ वाजेदरम्यान विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर दिवसभर विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई सुरु आहे.

शहरात २८ फेब्रुवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवेतील नागरिक व कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. संचारबंदीच्या काळात या ४२ नाकाबंदीच्या ठिकाणावर रस्त्यावरुन फिरणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. उशिरापर्यंत फिरण्याचे कारण जाणून घेतले जात आहे. कोणत्याही कारणाशिवाय फिरणार्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विनामास्क फिरणार्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलीस ठाणे व वाहतूक पोलिसांनी मंगळवारी दिवसभरात ९०२ विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ४ लाख ४६ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. आतापर्यंतपुणे शहरात २ लाख २८ हजार ५६० लोकांवर विनामास्कची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ११ कोटी ६ लाख ६ हजार ७०० रुपये दंड वसुल करण्यात आलाआहे.

जिल्ह्यात ७९३ नागरिकांवर कारवाई

पुणे जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी विनामास्क फिरणार्या ९७३ जणांवर कारवाई करुन १ लाख ९७ हजार ८०० रुपये दंड वसुल केला आहे. तर जिल्हा प्रशासनाने ९१३ जणांवर कारवाई करुन २ लाख ९८ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. मावळ तालुक्यात सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका