शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दुध दरवाढीच्या मागणीसाठी इंदापूरात रास्ता रोको; पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दूध ओतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 16:31 IST

दूध दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादकांना मोठ्या अर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे

इंदापूर : दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा या व इतर मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज सकाळी ( दि.२६) शेतक-यानी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुध ओतून देत रास्ता रोको आंदोलन केले.    कांदलगाव येथील ओंकार सरडे व पेटकरवस्ती येथील सागर पेटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दादा देवकर, धनाजी ननावरे, विजय शिंदे, बंटी रेडेकर, श्रावण चोरमले, महादेव सोमवंशी, लेमन गावडे व इतर शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक दिलीप पवार व मंडलाधिकारी सोपान हगारे यांनी आंदोलनकर्त्यांनी निवेदन स्वीकारले.    या संदर्भात ओंकार सरडे व सागर पेटकर यांनी सांगितले की, मागील कालावधीपासून दुधाचा दर सातत्याने घसरत चालला आहे. सध्या तो ३५ रुपयांवरुन अचानक कमी होवून २५ रुपयांवर आला आहे. त्यामुळे दुध उत्पादकांना मोठ्या अर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. शेती पिके की नाही याची खात्री नाही. किमान दुधाच्या व्यवसायातून तरी घरप्रपंच चालवता येईल या हेतूने सर्व स्तरातील तरुण शेतकरी खस्ता काढत, जनावरांच्या चारापाण्याची व्यवस्था करत आहेत. मात्र दुधाच्या पडत्या दराने शेतक-यांच्या कष्टाची पार माती केली. जनावरांच्या पालनपोषणाची खर्च ही निघेनासा झाला आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही तहसीलदारांकडे रीतसर निवेदन देवून हे आंदोलन केले आहे. याने फरक पडला नाही तर अधिक उग्र आंदोलन करण्याचा आमचा विचार आहे, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

दुध उत्पादकांच्या मागण्या 

 दुधाला प्रती लिटर ४० रुपये दर मिळावा. जनावरांसाठी चारा डेपो तयार करावेत. शासनाकडून पेंड मिळावी. प्रत्येक गावात पशु वैद्यकीय दवाखाना सुरु करावा. गेल्या पाच वर्षातील भेसळ प्रतिबंधक कारवायांचा अहवाल सादर करावा. जनावरांसाठी विनाशुल्क विमा सुरक्षा कवच योजना सुरु करावी. दूध दर मुल्य आयोगाची स्थापना करावी, शासकीय हमी भावाप्रमाणे दर न देणाऱ्या सरकारी व खाजगी प्रकल्पांवर कारवाई करावी. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरmilkदूधMarketबाजारFarmerशेतकरी