शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
6
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
7
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
8
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
10
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
11
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
12
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
13
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
14
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
15
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
16
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
17
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
18
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
19
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
20
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

आत्महत्या करायला निघालेल्या अंध विद्यार्थ्याला खाकी वर्दीच्या आड लपलेल्या ‘माणुसकी’चा प्रत्यय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 13:51 IST

फेब्रुवारी महिन्यात परीक्षेला सुरुवात होणार असल्याने अद्याप रायटर न मिळाल्याने त्याला नैराश्य आले होते.

ठळक मुद्देबारावीच्या परीक्षेसाठी शोधून दिला ‘रायटर’

पुणे : आत्महत्या करायला निघालेल्या एका अंध तरुणाला परावृत्त करत त्याला बारावीच्या परीक्षेसाठी ‘लेखनिक’ शोधून देत करारीपणा आणि धाक यासाठी प्रसिद्ध असलेल्या पोलिसांच्या खाकी वर्दीच्या आत असलेल्या ‘माणुसकी ’ चे अनोेखे दर्शन घडविले. खडक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केलेली मदत, समुपदेशन आणि प्रेमळ वर्तणुकीमुळे या तरुणाचे कुटूंब भारावून गेले आहे. अनिकेत राजेंद्र सिंगन (वय २०, रा. येवलेवाडी, कोंढवा रुग्णालयाजवळ, कोंढवा) हा तरुण १०० टक्के अंध आहे. त्याची आई आशा या एका कंपनीमध्ये मोलमजुरीची कामे करतात. त्याच्या वडीलांचे निधन झालेले आहे. त्याला दोन बहिणी असून एक बण बारावीमध्ये शिकते. ती हॉस्टेलवर राहात असून दुसरी बहिण आठवीमध्ये शिकते. हे कुटुंब मुळचे बार्शी तालुक्यातील आहे. मोठा असलेला अनिकेत मागील काही दिवसांपासून परीक्षेसाठी ‘रायटर’च्या (पेपर लिहून देणारे) शोधात होता. मात्र, त्याला रायटर मिळत नव्हता. फेब्रुवारी महिन्यात परीक्षेला सुरुवात होणार असल्याने अद्याप रायटर न मिळाल्याने त्याला नैराश्य आले होते. मुळातच हलाखीची परिस्थिती आणि त्यात आलेले नैराश्य यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. तो १६ जानेवारी रोजी पं. नेहरु रस्त्यावरील सोनावणे रुग्णालयासमोर बस थांब्यावर उभा होता. दुपारी तीनच्या सुमारास तो वाहनांच्या तसेच बसच्या खाली जाऊन आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. ही माहिती मिळताच लोहियानगर पोलीस चौकीचे हवालदार अंकुश मिसाळ, पोलीस नाईक तेजस पांडे आणि घाडगे हे तिघे घटनास्थळी गेले. त्यावेळीही अनिकेत वाहनांसमोर जात असल्याचे त्यांनी पाहिले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली त्यावेळी तो फक्त मला मरायचे आहे; मला सोडा असे म्हणत होता. पोलिसांनी त्याला चौकीमध्ये नेले. त्याला पाणी आणि चहा दिला. त्याच्याकडे आस्थेवाईकपणे चौकशी केल्यावर त्याला रायटर मिळत नसल्याने नैराश्य आल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्या आईशी फोनवरुन संपर्क साधला. दोघांचेही समुपदेशन केल्यावर होईल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याला विवेक जगदाळे नावाचा एक तरुण रायटर मिळाला. जगदाळे यांनी त्याची मदत करण्याची तयारी दर्शविली. ====पोलीस नियंत्रण कक्षावरुन एक अंध तरुण आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळताच लोहियानगर पोलीस चौकीच्या पोलिसांनी तातडीने हालचाली करीत अनिकेतला ताब्यात घेतले. त्याचे समुपदेशन केले. त्याच्या आईशी संवाद साधला. आम्ही त्याची परिस्थिती आणि त्याची निकड यासंदर्भात छोटासा संदेश तयार करुन तो व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मिडीयावर प्रसारीत केला. हा संदेश वाचून अनेक संवेदनशील नागरिक मदतीसाठी पुढे आले. आता त्याला रायटर मिळाला असून त्याची समस्या सुटली आहे. तो आता परिक्षेची तयारी करतोय हीच आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. - राजेंद्र मोकाशी, वरिष्ठ निरीक्षक, खडक पोलीस ठाणे ====पोलिसांनी दाखवलेली माणुसकी आणि प्रेम यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत.आमची परिस्थिती हलाखीची आहे. माझ्या मुलाचे पोलिसांनी प्राण वाचवले. त्याची समजूत काढून त्याला रायटर मिळवून दिला. आता त्याची मनस्थिती चांगली आहे. आत्महत्येचा विचार त्याच्या मनामधून निघून गेला आहे. पोलीस अधूनमधून फोन करुन त्याची चौकशी करतात. यानिमित्ताने जगामध्ये गरिबांना अशा प्रकारे मदत करणारी संवेदनशील माणसेही आहेत याचा अनुभव आला. - आशा सिंगन, अनिकेतची आई

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाPoliceपोलिस