शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

धायरीत प्रेमभंगातील रागामुळे प्रेयसीच्या घराजवळ स्फोट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 16:38 IST

प्रेमभंग झाल्यामुळे युवतीला धडा शिकविण्यासाठी तिच्या घराच्या परिसरात स्फोट घडविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देधायरीतील स्फोटाचे गुढ उकलले : दोघा तरुणांना अटक 

पुणे : प्रेमभंग झाल्यामुळे युवतीला धडा शिकविण्यासाठी तिच्या घराच्या परिसरात स्फोट घडविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धायरी येथे बुधवारी पहाटे झालेल्या स्फोटप्रकरणी पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली आहे.  या स्फोटाने बुधवारी रात्री संपूर्ण धायरी परिसर हादरला होता. किशोर आत्माराम मोडक  (वय २०) आणि अक्षय राजाभाऊ सोमवंशी (वय २४, दोघेही रा. वडकी, १० वा मैल, सासवड रोड, पुणे) या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशोरची मावशी धायरी परिसरात राहते. त्याच परिसरात एक तरुणी राहत होती. मावशीकडे नेहमी जाणे-येणे असल्याने किशोरचे या तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. सुमारे दोन वर्षांपासून असलेले प्रेमसंबंध युवतीने अचानक संपविल्याने किशोर चिडला. प्रेमभंगाच्या रागातून त्याने युवतीला धडा शिकविण्याचे ठरविले.बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तो मित्रासह मोटारीतून फटाक्याची दारू मोठ्या प्रमाणात एकत्र करून एका काडीपेटीच्या आकाराच्या वस्तूत भरली. तसेच एमसीलमध्ये बॉल बेअरिंग टाकून त्यास वात लावली. या प्रकारे बॉँबसदृश वस्तूचा त्याने स्फोट केला. या प्रकारात घराची खिडकी फुटली होती. परिसरात स्फोट झाल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसराची संपूर्ण पाहणी केली. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही फुटेजही तपासले. या वेळी पहाटेच्या सुमारास किशोर आणि अक्षय या परिसरात असल्याचे दिसले होते. त्यांना ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखविल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला. 

टॅग्स :DhayariधायरीPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrimeगुन्हा