शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकमेलिंगने संसार उद्ध्वस्त : पत्नीच्यापाठोपाठ पतीचीही आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 02:41 IST

विवाहितेच्या आई-वडील, काकाविरुद्ध गुन्हा

पुणे : ब्लॅकमेलिंगला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्यावर तिच्याच घरच्यांच्या तक्रारीनंतरच्या ब्लॅकमेलिंगमुळे पतीनेही आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आंबेगाव परिसरात घडली. सागर शिळीमकर (वय ३२) असे या तरुणाचे नाव आहे. पूर्वीचे प्रेमसंबंध माहिती झाल्याने धमकावणाऱ्या दिराला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दिराला अटक केली.

दरम्यान, विवाहितेच्या पालकांनी ५ लाख रुपयांची मागणी केल्याने तिच्या पतीनेही आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या जोडप्याने आंबेगाव येथील राजयोग सोसायटीतच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सागर शिळीमकर असे आत्महत्या करणाºयाचे नाव आहे. सागरच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विवाहितेचे आई-वडील, काकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की सागरची पत्नी गीतांजली व तिचा प्रियकर आयर्न राक्षे यांना सागरच्याच फ्लॅटमध्ये असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. यावरून गीतांजलीने सागरशी भांडण करून २४ सप्टेंबरला आत्महत्या केली होती. त्यानंतर गीतांजलीची आई जयश्री पवार यांनी सागरचा दीर सुहास शिळीमकर याला तिच्या मृत्यूस जबाबदार ठरवले. शिवाय, गीतांजलीचे प्रेमसंबंध सर्वांना सांगेल, अशी धमकी देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती, असा आरोपही त्यांनी केला होता़

यापूर्वीही गीतांजलीचे काका लक्ष्मण बर्डे यांनी असेच आरोप करून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये उकळल्याचा आरोप शिळीमकर कुटुंबीयांनी केला आहे. या गुन्ह्यातून बाहेर काढण्याचे आश्वासन देत जयश्री पवार यांनी त्यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. या प्रकाराने त्रासलेल्या सागरने जेथे गीतांजलीने आत्महत्या केली होती, त्याच घरात २९ सप्टेंबरला गळफास घेतला.दरम्यान, याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी लक्ष्मण बर्डे आणि आर्यन राक्षे यांना अटककेली आहे़ पोलीस उपनिरीक्षक खानविलकर अधिक तपासकरीत आहेत.गीतांजली व सागर यांचा डिसेंबर २०१३ मध्ये विवाह झाला होता़ लग्नानंतर दोनच महिन्यांनी तिचा दीर सुहास याला गीतांजलीचे लग्नापूर्वी चाकणमधील एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. ती पतीबरोबर आंबेगाव खुर्द येथे राहत होती, तर तिचा दीर सुहास भोर तालुक्यातील वीरवाडी येथे राहतो. तो जाणीवपूर्वक पुण्यात येऊन गीतांजलीला लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधाची माहिती घरच्यांना सांगेन, अशी धमकी देत होता. तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत असे, या धमक्यांना कंटाळून गीतांजलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती, अशी तक्रार तिची आई जयश्री पवार यांनी दिली होती़ 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी