शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील अभाविपच्या कार्यालयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फासलं काळं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 15:11 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गुंडांमध्ये दम असेल तर त्यांनी आता कार्यालयात येऊन दाखवावे ...

ठळक मुद्देजेएनयु येथे करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध... घटनेविरोधात अभाविपने पोलिसांकडे नोंदवली तक्रार या निंदनीय घटनेचा अभाविपकडून तीव्र निषेध.. टिळक रस्त्यावर अभाविपचे महानगर प्रांत कार्यालय

पुणे : जेएनयु येथे करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अखिल विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्ते गरवारे महाविद्यालयाच्या इथे एकत्र जमले होते . त्यादरम्यान टिळक रस्त्यावरील कार्यालयाला राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी दिल्लीतील जेएनयु विद्यापीठातील घटनेचा निषेध म्हणून अभाविपच्या फलकाला काळं फासल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी (दि. ७) दुपारी घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , टिळक रस्त्यावर अभाविपचे महानगर प्रांत कार्यालय आहे. मात्र, जेएनयु इथे विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत असताना त्याचे लोन पुण्यात देखील आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एफटीआयआय अशा विविध ठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. तसेच हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप देखील सातत्याने केला जात आहे. त्याच धर्तीवर अभाविपकडून हल्ल्याचा निषेध नोंदवत हा हल्ला त्यांनी केला नसल्याचा खुलासा देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून सर्व कार्यकर्ते आज गरवारे महाविद्यालयाच्या इथे एकत्र आले होते. त्याठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी गेलेल्या वेळेतच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे १५ ते वीस कार्यकर्ते टिळक रस्त्याच्या अभाविपच्या कार्यालयालयाजवळ एकत्र आले त्यांनी अभाविपविरुद्ध घोषणाबाजी करत त्यांच्या फलकाला काळं फासले. 

महानगर मंत्री अनिल ठोंबरे म्हणाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे महानगर कार्यालयास काळे फासण्याचे निंदनीय कृत्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गुंडांनी केले आहे. या घटनेचा अभाविप तीव्र निषेध करते.या घटनेविरोधात अभाविपने पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून पोलिस प्रशासनाने कोणत्याही दबावाखाली न येता कार्यवाही करावी व असे कृत्य करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी अभाविप करत आहेत.

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी अभविप चे कार्यकर्ते गरवारे महाविद्यालयात गेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी कार्यालयाला काळे फासण्याचे निंदनीय कृत्य केले आहे. पुणे महानगरातील अनेक कार्यकर्ते कार्यालयाजवळ जमून या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत.ज्यांनी ही घटना घडवून आणली त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गुंडांमध्ये दम असेल तर त्यांनी आता कार्यालयात येऊन दाखवावे असा इशारा महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसjnu attackजेएनयू