भाजपा हे राष्ट्रवादीचे नेक्स्ट व्हर्जन : शिवतारे
By Admin | Updated: February 15, 2017 01:48 IST2017-02-15T01:48:28+5:302017-02-15T01:48:28+5:30
‘राष्ट्रवादीने वाळूमाफिया गुंडांना पक्षात मोठे स्थान दिल्याने त्यांचे जहाज बुडले आहे. तेच वाळूमाफिया व गुंड आता भाजपात येऊ लागल्याने राष्ट्रवादीचे नेक्स्ट व्हर्जन

भाजपा हे राष्ट्रवादीचे नेक्स्ट व्हर्जन : शिवतारे
कोरेगाव भीमा : ‘राष्ट्रवादीने वाळूमाफिया गुंडांना पक्षात मोठे स्थान दिल्याने त्यांचे जहाज बुडले आहे. तेच वाळूमाफिया व गुंड आता भाजपात येऊ लागल्याने राष्ट्रवादीचे नेक्स्ट व्हर्जन भाजपा आहे. यांच्यापासून सावध राहा व जिल्हा परिषदेनंतर थेट विधानसभेच्या तयारीला लागा,’ असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.
पाबळ (ता. शिरूर) येथे शिवसेनेच्या केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार जयश्री पलांडे, पाबळ गणाचे उमेदवार सोपान जाधव , केंदूर गणाच्या उमेदवार शीतल दरेकर यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत विजय शिवतारे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राम गावडे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, सरपंच मनीषा बगाटे, उपसरपंच सारिका पानसरे व ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव, वसंत पिंगळे, संपत कापरे, रवी चौधरी, सुखदेव थोरवे, चेतन दरेकर, देवा उमाप व शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
शिवतारे म्हणाले, ‘२५ वर्षे केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाबरोबर युती, मतदानाचे विभाजन नको म्हणून केले. मात्र, तोच पक्ष आता सर्वसामांन्याच्या जिवावर उठला आहे. यापुढे शिवसेना स्वबळावरच निवडणुका लढवणार असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचेच सरकार सत्तेत असेल. (वार्ताहर)