शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Pune Mayor : भाजपचा मास्टरस्ट्रोक..! पुणे महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे, उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर अर्ज भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:02 IST

येत्या ९ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत नागपुरे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडण्याची शक्यता अधिक बळावली आहे.  

पुणे : पुणे महापालिकेच्या महापौरपदाच्या शर्यतीत अखेर मंजुषा नागपुरे यांचे नाव आघाडीवर आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. तर उपमहापौर पदासाठी परशुराम वाडेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे येत्या ९ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत नागपुरे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडण्याची शक्यता अधिक बळावली आहे.  महापौर आणि उपमहापौर पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत असून महापालिकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने दोन्ही पदांवर त्यांचाच दावा जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर होणे ही केवळ औपचारिकता उरली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.अलीकडे झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने १६५ पैकी तब्बल ११९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव असल्याने अनुभवी महिला नगरसेवकांना संधी देण्याच्या हालचाली पक्षात सुरू आहेत.या पदासाठी वर्षा तापकीर, रंजना टिळेकर, स्मिता वस्ते आणि मानसी देशपांडे यांची नावे चर्चेत होती. तसेच उज्ज्वला जंगले, मनीषा चोरबोले आणि माजी मंत्री दिवंगत गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांच्याही नावाचा विचार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अनुभवी आणि संघटनात्मक कामाचा ठसा उमटवलेल्या मंजुषा नागपुरे यांना प्राधान्य दिल्याचे संकेत मिळत आहेत.दरम्यान, पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीत तीन महिलांना प्रत्येकी दहा महिन्यांसाठी महापौरपद देण्याचा ‘रोटेशन फॉर्म्युला’ वापरण्याचाही पर्याय पक्ष पातळीवर चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार की नाही यावर उशिरापर्यंत चर्चा सुरू होती, तर काँग्रेसकडून दोन्ही पदांसाठी उमेदवार उतरवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार की एकतर्फी, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's Masterstroke: Manjusha Nagpure for Pune Mayor, Wadekar for Deputy

Web Summary : Manjusha Nagpure is likely to be Pune's next mayor as BJP favors her candidacy. Parshuram Wadekar will file for Deputy Mayor. With BJP holding a majority, their victory is almost certain, though opposition parties may still compete.
टॅग्स :PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMayorमहापौर