शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नवनिर्माणाच्या आडून भाजपाचा छुपा प्रचार : पंतप्रधानांचेच आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 17:03 IST

नवभारतनिर्माण संकल्प सिद्धी अभियान या संस्थेच्या माध्यमातून गेले काही महिने भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत.

ठळक मुद्देशाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये लक्ष्यद्र सरकारमधूनच पक्षाच्या सर्व जिल्हा कार्यालयांना अशी संस्था सुरू करण्याचा आदेश

राजू इनामदार 

पुणे: नवभारतनिर्माण संकल्प सिद्धी अभियान या संस्थेच्या माध्यमातून गेले काही महिने भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. ही संस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरूनच स्थापन करण्यात आली आहे. थेट राजकीय प्रचार करता येत नाही अशा संस्था, सरकारी कार्यालये यांना लक्ष्य करण्याचा व तिथे पक्षाचा विचार पोहचवण्याच्या सुचना वरिष्ठ स्तरावरून पक्ष पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.  पुण्यात या संस्थेचे समन्वयक भाजपाचे शहराध्यक्ष असलेले योगेश गोगावले हेच आहेत. संस्था शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये यांच्या कार्यक्षेत्रात जाऊन वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. भाजपाच्या नगरसेवकांना त्यात प्रामुख्याने सामावून घेतले जात आहे. सरकारी कार्यांलयांमध्ये जाण्यास राजकीय पक्षांना मर्यादा येतात. तसेच तो टीका विषय होण्याची शक्यता असते. ती अडचण या संस्थेच्या माध्यमातून दूर करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांसाठी सरकारी कार्यालयांचे साह्य घेण्यात येत आहे. तिथे व ज्याठिकाणी राजकीय अभिनिवेश घेऊन जाणे अडचणीचे आहे तिथे जावे व सरकारी योजनांचा प्रसार करावा, त्या राबवाव्यात व थेट लाभार्थींपर्यंत पोहचवाव्यात असे पक्षातील वरिष्ठ स्तरावरून सांगण्यात आले असल्याची माहिती पक्षाच्याच काही पदाधिकाऱ्यांकडून नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली आहे. बांबू विकास महामंडळ, महिला विकास महामंडळ या सरकारी कार्यालयाच्या योजना आता भारत नवनिर्माण संकल्प सिद्धी अभियानातून पुढे येत आहेत. अशा कार्यक्रमांच्या नियोजनाची बैठक पक्ष कार्यालयात होते. तुमच्याच खात्याच्या योजनेचे काम आहे, त्याला तुम्ही उपस्थित राहणे आवश्यक आहे असे संबधित खात्यांच्या प्रमुखांना सांगण्यात येत असते. महापालिकेत भाजपाचीच सत्ता आहे. तेथील काही अधिकाऱ्यांनाही पक्ष कार्यालयात उपस्थित राहून सरकारी योजनेसाठी महापालिकेचे साह्य आवश्यक आहे असे सांगून त्यांची मदत घेण्यात येत आहे. केंद्र सरकारमधूनच पक्षाच्या सर्व जिल्हा कार्यालयांना अशी संस्था सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. संस्थेचे पदाधिकारी म्हणून पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी काम करतील व पक्षाचे नाव तळापर्यंत पोहचेल याची काळजी घेतील अशी सुचना देण्यात आली आहे. सत्ता असूनही तिचा जनमाणसावर विशेष प्रभाव पडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर नवमतदार व सरकारी कर्मचारी, अधिकारी हा वर्ग आकर्षित करून घेण्यासाठी म्हणून हा फंडा काढण्यात आला आहे अशी भाजपाच्याच काही कार्यकर्त्यामध्ये चर्चा आहे. महिलांसाठीच्या तसेच युवक. पर्यावरण संवर्धन, क्रीडा अशा विषयांसाठीच्या योजना भारत नवनिर्माण संकल्प सिद्धी अभियानाच्या माध्यमातून राबवण्याच्या प्रयत्न करण्यात यावा असे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.पुणे शहरातही या संस्थेचे काम सुरू झाले आहे. शहरातील रिकामे भूखंड तसेच बीडीपी आरक्षित जागेवर बांबूचे बेट तयार करण्यासाठी बांबूंची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी बांबू विकास महामंडळाचे साह्य घेण्यात आले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही यात सामावून घेण्यात आले असून बैठकीसाठी त्यांनाही बोलावण्यात आले होते. महिलांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी अभियान राबवण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे साह्य घेण्यात आले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात शहरातील विविध वसाहतींमधील ५ हजार महिला लक्ष्य ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी महिला नगरसेविकांना संस्थेचे समन्वयक करण्यात आले आहे. सर्व कामे भारत नवनिर्माण संस्थेच्या माध्यमातून होतील याची काळजी घेण्यात येत आहे. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCentral Governmentकेंद्र सरकार