BJP's first public meeting in Pune: Girish Bapat Anil Shirole | तुम्हारे जीत से ज्यादा चर्चे तो मेरे हार के है !
तुम्हारे जीत से ज्यादा चर्चे तो मेरे हार के है !

पुणे : पुण्यातून गिरीश बापट यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळले असले तरी सर्वाधिक चर्चा ही तिकीट नाकारलेले खासदार अनिल शिरोळे यांची आहे.
आश्चर्य म्हणजे बापट यांना तिकीट जाहीर झाल्यावर शिरोळे यांनी दिल्लीतून पुण्यात येऊन थेट बापट यांची भेट घेतली आणि  सर्वांचेच लक्ष वेधले.पुण्यात भाजपच्या पहिल्या प्रचारसभेतही त्यांनी बापट यांच्या प्रचाराचे भाषण केले आणि उपस्थित अवाक झाले.तिकीट मिळाले नाही म्हणून कोणाचाही विचार न करता पक्षांतर करणारे उमेदवार असताना शिरोळे यांची अपयश पचवण्याची शैली शहरात चर्चेची बनली आहे.


अर्थात शिरोळे यांच्या दिलदारपणाचे कौतुक जावडेकर यांनी आवर्जून केले. ते आपल्या भाषणाच्या सुरुवातीला शिरोळे यांचे भाषण ऐकून मन भरून आल्याचे सांगितले. पुढे ते म्हणाले की, ही भाजपाची परंपरा आहे. जसं रिलेच बॅटल दुसऱ्याच्या हातात दिले जाते तितक्या सहजतेने शिरोळे यांनी बॅटल बापट यांच्या हाती दिले.
दुसरीकडे आमदार मेधा कुलकर्णी आणि त्यांच्याचकडून २०१४ साली पराभूत झालेले शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. मागील लोकसभेत एकत्र काम केलेले मात्र विधानसभा आणि महापालिकेत वेगवेगळे लढलेले भाजप आणि सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी एकत्र आल्याचे चित्र बघायला मिळाले. 


Web Title: BJP's first public meeting in Pune: Girish Bapat Anil Shirole
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.