भाजपचा ‘डीएनए ’ विरोधी पक्षाचा; सत्तेसाठी लाचार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 05:21 AM2020-01-06T05:21:57+5:302020-01-06T05:22:04+5:30

भारतीय जनता पक्ष कधीही सत्तेसाठी लाचार नाही, यामुळे सत्तेसाठी पक्षाच्या मूळ विचारधारेशी कधीच प्रतारणा करणार नाही.

BJP's 'DNA' opposition party; No help for power | भाजपचा ‘डीएनए ’ विरोधी पक्षाचा; सत्तेसाठी लाचार नाही

भाजपचा ‘डीएनए ’ विरोधी पक्षाचा; सत्तेसाठी लाचार नाही

Next

पुणे : भारतीय जनता पक्ष कधीही सत्तेसाठी लाचार नाही, यामुळे सत्तेसाठी पक्षाच्या मूळ विचारधारेशी कधीच प्रतारणा करणार नाही. आम्ही सत्तेसाठी तडफत आहोत ही सत्ताधाऱ्यांची टीका चुकीची असून, आमचा ‘डीएनए’च विरोधी पक्षाचा आहे. तर काँगे्रससाठी सत्ता हेच आॅक्सिजन असून सध्या ते टवटवीत झाले आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधाऱ्यांना लावला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरेकर यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम रविवारी झाला. दरेकर म्हणाले, शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व, मराठी भाषा, अस्मिता सोडून दिली आहे. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याची संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे. राज्यात सत्तेवर आलेली महाविकास आघाडी अनैसर्गिक आणि अभद्र आहे. सत्तेवर येण्यापूर्वी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी शेतकºयांच्या बांधावर जाऊन प्रत्येक शेतकºयांना किमान २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देऊन, शेतकºयांचे कर्ज सरसकट माफ करुन सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते. आता मुख्यमंत्री म्हणून त्यांना ही आश्वासने पूर्ण करण्याची चांगली संधी होती. परंतु, अवकाळीग्रस्त शेतकºयांना तुटपुंजी मदत देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. तसेच २ लाखांची खर्च माफीची घोषणाकरुन शेतकºयांचा अपमान केला आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या आणि अस्मितेच्या आड आल्यास सत्ताधाºयांना जाब विचारण्याचे काम करू, असे दरेकर यांनी सांगितले.
>पक्ष नव्या जबाबदाºया देऊ शकतो
पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे हे तिघेही मंत्री होते, खडसे विरोधी पक्षनेते होते. मग तो अन्याय नाही का? यावर ते म्हणाले, एखाद्या वेळी पक्षाकडून काही कारणास्तव थोडे इकडे-तिकडे झाले असेल, तर अन्याय-अन्याय करण्यात अर्थ नाही. हे तिन्ही नेते मोठे असून, त्यांना पक्ष नव्या जबाबदाºया देऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: BJP's 'DNA' opposition party; No help for power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.