‘भाजपाने, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?’

By Admin | Updated: February 16, 2017 02:51 IST2017-02-16T02:51:53+5:302017-02-16T02:51:53+5:30

‘‘काही माणसं कोणाचीच नसतात. ती पदासाठी हपापलेली असतात. त्यांना निष्ठाही नसल्याने अशा उमेदवारांना बाजूला करावे.

'BJP, where have you taken Maharashtra?' | ‘भाजपाने, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?’

‘भाजपाने, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?’

कोरेगाव भीमा : ‘‘काही माणसं कोणाचीच नसतात. ती पदासाठी हपापलेली असतात. त्यांना निष्ठाही नसल्याने अशा उमेदवारांना बाजूला करावे. आमदार बाबूराव पाचर्णे यांनी १ हजार कोटी कोठून आणले, याचा जाब जनतेने विचारण्याची गरज आहे. याबरोबरच भाजपाला, ‘कुठं नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र?’ हे विचारण्याची आज गरज निर्माण झाली असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
शिक्रापूर गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार कुसुम आबाराजे मांढरे, सणसवाडी गणाच्या मोनिका हरगुडे, शिक्रापूर गणाच्या जयमाला जकाते, व तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत अजित पावर बोलत होते. या वेळी माजी आमदार अशोक पवार, जालिंदर कामठ आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘‘आमदार बाबूराव पाचर्णे सांगतात, की शिरूर-हवेलीत १ हजार कोटी आणले; पण त्यांनी जिल्ह्यात बजेट किती , तालुक्याला किती निधी
मिळतो, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. (वार्ताहर)

Web Title: 'BJP, where have you taken Maharashtra?'