शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
3
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
4
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
5
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
6
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
7
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
8
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
9
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
10
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
11
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
12
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
13
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
14
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
15
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
17
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
18
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
19
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
20
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:43 IST

Pooja More PMC Election 2026: या पक्षातून एखाद्या पदावर जात तळागाळातील लोकांसाठी न्याय देण्याचं काम मला करायचे होते. परंतु माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्या चुकीचा मोठा बाऊ करून माझ्याविरोधात षडयंत्र झाले. त्याच्या मला वेदना होतायेत असं त्यांनी सांगितले.

पुणे - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक २ मधून पूजा मोरे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली होती. मात्र या उमेदवारीवरून प्रचंड टीका भाजपा कार्यकर्त्यांकडून पक्षावर होत होती. अखेर भाजपा कार्यकर्त्यांनी उघडलेल्या मोहिमेनंतर पूजा मोरे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे. 

पूजा मोरे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया आणि फडणवीसांवर केलेले टीका यावरून कार्यकर्त्यांकडून प्रचंड ट्रोल केले जात होते. त्यानंतर अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे यांच्या डोळ्यात पाणी आले. त्या म्हणाल्या की, माझा प्रवास खूप सामान्य घरातून झाला आहे. मी धनंजय जाधव यांच्याशी लग्न करून या पुण्यात राहायला आले. पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खात शेतकऱ्यांसाठी गुन्हे अंगावर घेतले. कोर्टाच्या चकरा मारल्या. न्यायालयात खटले लढवायला माझ्याकडे पैसे नसायचे या परिस्थितीतून मी पुढे आलीय. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या पक्षाची उमेदवारी मिळत नाही. ते भाग्य माझ्या नशिबात आले होते. या पक्षातून एखाद्या पदावर जात तळागाळातील लोकांसाठी न्याय देण्याचं काम मला करायचे होते. परंतु माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्या चुकीचा मोठा बाऊ करून माझ्याविरोधात षडयंत्र झाले. त्याच्या मला वेदना होतायेत असं त्यांनी सांगितले.

तसेच मी लढणारी मुलगी आहे. मी संघर्ष करत राहणार. माझा भाजपात प्रवेश झाला आहे. मला पक्षाची उमेदवारीही मिळाली होती. मी हिंदू धर्म संस्कृतीत पती हा आपल्यासाठी देवासारखा असतो. माझं १०-१५ वर्षापूर्वीचं आयुष्य पूर्ण वेगळे होते. मी ग्रामीण भागात वाढलीय. कारखानदाराच्या विरोधात मी शेतकऱ्यांचा लढा लढला आहे असं पूजा यांनी म्हटलं. 

दरम्यान,  मला हिंदुत्व शहरात आल्यावर कळायला लागले. पहलगाम हल्ल्यानंतर मी जी प्रतिक्रिया दिली तेव्हा ती लगेच दिली होती. परंतु जेव्हा मी त्यातील पीडितांना भेटले, लोकांना भेटले तेव्हा धर्म विचारूनच हा हल्ला झाला हे मला कळले. तेव्हा हिंदू म्हणूनच मारण्यात आले होते असं मी प्रतिक्रिया दिली. मात्र माझा आधीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. राहुल गांधींसोबतचा फोटो व्हायरल होतो. मी शेतकरी संघटनेत काम करत होते. भारत जोडो यात्रा जेव्हा मराठवाड्यात आली तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निवेदन देण्यासाठी मी त्यांना भेटले. कापसाला भाव मिळाला पाहिजे. आयात निर्यात धोरणावर काम केले पाहिजे असं मी त्यांना म्हटले. परंतु माझा तो फोटोही व्हायरल केला जात आहे. परंतु मला यातून बाहेर पडायचे आहे. मी भाजपाची कार्यकर्ता आहे. मला हिंदुत्वासाठी काम करायचे आहे असंही पूजा मोरे यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Setback for BJP in Pune: Candidate withdraws, Pooja More in tears.

Web Summary : BJP faced backlash in Pune after nominating Pooja More. Following criticism over her past remarks, More withdrew her candidacy, tearfully citing a conspiracy and her desire to serve the people, while affirming her commitment to Hindutva and the BJP.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६BJPभाजपाMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५Electionनिवडणूक 2026