शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेमध्ये भाजपा-शिवसेनेत धुसफूस सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 12:30 IST

पक्षप्रमुखांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे खूशीत आलेल्या शिवसैनिकांमध्ये लोकसभेसाठी युती झाल्याने नाराजी निर्माण झाली,

ठळक मुद्देपुणे महापालिकेच्या विषय समित्या व प्रभाग समित्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने दाखवला ठेंगा सत्तापदाचे वाटप भाजपाने पालिकेतील सत्तेपासून करावे अशी होती शिवसेनेची अपेक्षा

पुणे : पुणे महापालिकेच्या विषय समित्या व प्रभाग समित्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने ठेंगा दाखवल्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक संतप्त झाले आहेत. विधानसभेसाठी इच्छुक असलेलेही लोकसभा निवडणूकीनंतर भाजपाने लगेच घेतलेल्या या पवित्र्यामुळे धास्तावले आहेत. संपर्क प्रमुखांकडे याविषयी तक्रार करण्याचा निर्णय झाला असून त्याची दखल पक्षप्रमुखांनी घ्यावी असे नगरसेवक तसेच शहर पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पक्षप्रमुखांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे खूशीत आलेल्या शिवसैनिकांमध्ये लोकसभेसाठी युती झाल्याने नाराजी निर्माण झाली, मात्र पक्षाचा निर्णय म्हणून सर्वांनीच लोकसभेसाठी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात व त्यातही पुणे लोकसभेत निष्ठापुर्वक भाजपाचे काम केले. त्यानंतर सत्तापदाचे वाटप भाजपाने पालिकेतील सत्तेपासून करावे अशी शिवसेनेची अपेक्षा होती. पालिकेतील भाजपाचे संख्याबळ ९८ आहे. त्यातुलनेत शिवसेनेचे फक्त १० नगरसेवक आहेत. पालिकेची निवडणूक झाल्यापासून शिवसेना भाजपाच्या विरोधात काम करत आहे. त्यामुळेच पालिकेच्या सत्तेत शिवसेनेला सामावून घेण्यास पालिकेतील भाजपाचे धुरिण तयार नाहीत.तरीही विषय समित्यांच्या निवडणूकीत आपल्याला शहर सुधारणा व महिला बाल कल्याण या दोन महत्वाच्या समित्या द्याव्यात अशी मागणी शिवसेनेने केली. ती भाजपाने धुडकावून लावली व त्यासाठी यासंदर्भात राज्यस्तरावर धोरण ठरायला हवे अशी भुमिका घेतली. हवे असेल तर दोन समित्यांच्या उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करावेत अशीही सुचना केली. शिवसेनेने त्याला नकार दिला व एकाही समितीसाठी अर्ज दाखल केला नाही. त्यानंतर प्रभाग समित्यांमध्येही हाच प्रकार झाला. तिथेही भाजपाने शिवसेनेले ठेंगा दाखवत बहुसंख्य प्रभाग समित्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.लोकसभा निवडणूकीनंतर भाजपाने लगेच घेतलेल्या या धोरणामुळे विधानसभेसाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे शहर पदाधिकारी धास्तावले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी किमान तीन मतदारसंघ मिळावेत अशी शिवसेनेची इच्छा आहे. मात्र ती फळाला येण्याची शक्यता भाजपाच्या शिवसेनेला पालिकेतील सत्तेपासून दूर ठेवण्याच्या धोरणामुळे धूसर झालेली दिसते आहे. याबाबत काही नगरसेवक संपर्क प्रमुखांकडे तक्रार करण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यासाठी शहर पदाधिकाºयांची फूस असून ही तक्रार थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा