शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर तिथेच बांधण्यासाठी भाजप कटिबद्ध :  अमित शहांचा पुनरूच्चार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 15:24 IST

अयोध्येतील राम मंदिर ठरलेल्या जागीच होणार असून तिथे मंदिर बांधण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याच्या विधानाचा पुनरूच्चार भाजपचे  राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यात केला

पुणे :   अयोध्येतील राम मंदिर ठरलेल्या जागीच होणार असून तिथे मंदिर बांधण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याच्या विधानाचा पुनरूच्चार भाजपचे  राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यात केला. या विषयवार शरद पवार आणि काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी असे आव्हानही त्यांनी दिले. शहरात भरवण्यात आलेल्या शक्ती केंद्र प्रमुखांच्या संमलेनात त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, जिल्हाध्यक्ष आ. बाळासाहेब भेगडे उपस्थित होते. 

           यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीवर टीका केली.पुढे ते म्हणाले की,कॉग्रेसचा ओआरओपी (वन रँक वन पेन्शन) केवळ वन राहुल और वन प्रियंका आहे. आजपर्यंत मौनीबाबाचे भारतात सरकार आहे म्हणून अतिरेकी देशात घुसले. मात्र मोदींनी सर्जीकल स्ट्राईक करून सडेतोड उत्तर दिले. आणि देशात मौनीबाबाचे सरकार नाही हे दाखवून दिले. चाळीस लाख घुसखोरांना मोदी सरकारने  शोधून पळवून लावले. विरोधकांना रडत बसु द्या, मला महाराष्ट्रातून लोकसभेच्या ४५ जागा जिंकून द्या, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचे सर्व घुसखोर शोधून शोधून ठेचून काढू. 

पुढे ते म्हणाले की, भाजपची ओळख कार्यकर्ता आहे. अनेक गोष्टींच्या बाबतीत भाजप इतर पक्षांपेक्षा खूप वेगळी आहे. ही पार्टी नेत्यांची नाही तर कार्यकर्त्यांची आहे. अनेक लढाया आम्ही केवळ कार्यकर्त्यांच्या जीवावर जिंकल्या आहेत. 

  • आगामी लोकसभेची निवडणुक देशाची भविष्यातूल वाटचाल दर्शवणारी आहे. जातीवाद, परिवारवाद याला नाकारून विकास करणाऱ्या नेतृत्वाला पुढे नेणारी ठरणार आहे. 
  • काँग्रेस सरकारने १० वर्षात ५३ हजार कोटी कर्ज माप केले होते. भाजपने ५ वर्षात ७५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. राहुल गांधी यांना तर बटाटा जमीनीच्या वर येतो की जमिनीमध्ये येतो, हे सुद्धा माहीत नाही. 
टॅग्स :Amit Shahअमित शहाPoliticsराजकारणBJPभाजपाRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या