शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

Narendra Modi Pune visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा; भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 14:19 IST

सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दौऱ्याचा आढावा घेतला

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. मोदींच्या हस्ते मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या यांचे उद्घाटन होणार आहे. तसेच संगमवाडी ते बंडगार्डन हा नदी काठ सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन, पंतप्रधान आवाज योजनेतील १ हजार घरांची लॉटरी, पीएमपीच्या ७० ई-बसेसचे लोकार्पण, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे व महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उदघाटन असे कार्यक्रम होणार आहेत. 

याबाबत सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दौऱ्याचा आढावा घेतला. तसेच नियोजित कार्यक्रमांची माहिती घेऊन चर्चा केली. सत्ताधारी भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली जात आहे. त्यांच्या हस्ते निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याचा सत्ताधारी भाजपचा मानस आहे.

जाणून घ्या पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा 

-  पंतप्रधान मोदी यांचे ६ मार्च रोजी सकाळी १०:३० मिनीटांनी लोहगाव विमानतळावर आगमन होईल. -  महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमाला जाणार आहेत. -  मेट्रोच्या उद्घाटनासाठी गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्टेशनवर जातील. तेथून मेट्रोने ते आनंदनगर स्टेशन येथे जाणार आहेत.- मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची जंगी सभा होणार आहे. - सभेनंतर हेलिकॉप्टरने ते लवळे येथील कार्यक्रमाला जाणार आहेत. - दुपारी ३ च्या सुमारास लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMetroमेट्रोBJPभाजपा